शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

HP नं लॉन्च केला AI तंत्रज्ञान असलेला गेमिंग लॅपटॉप; जबरदस्त फिचर्स, किंमत पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:54 IST

HP ने भारतात आपले नवीन पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ज्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

 मुंबई - लॅपटॉप क्षेत्रात प्रसिद्ध HP कंपनीनं AI तंत्रज्ञान असलेले २ नवीन लॅपटॉप बाजारात आणले आहेत. गेमर्स आणि कंटेट क्रिएटर्ससाठी अतिशय उपयुक्त असा हा लॅपटॉप असून ओमेन ट्रान्सेंड १४ आणि HP Envy x360  14 चा समावेश आहे. त्याचसोबत गेमिंगचा आणि कंटेट क्रिएशनचा अनुभव आणखी सुकर करण्यासाठी या लॅपटॉपमध्ये Intel चे अल्ट्रा प्रोसेसर्स दिले आहेत.  

AI तंत्रज्ञानावर भर देऊन ग्राहकांना आणखी समृद्ध करणं तसंच गेमिंग आणि काम हे सर्व अनुभव सुकर करणं हे HP कंपनीचं ध्येय आहे असं एचपी इंडियाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता म्हणाल्या. एआय तंत्रज्ञान असलेले लॅपटॉप या व्यापक उद्योगक्षेत्रात आणताना आम्हाला अभिमान वाटतोय. एआय आधारित पर्सन्लायझेशनमुळे आम्ही युजर एक्सिपिरियन्स आणखी समृद्ध करत आहोत. त्यामुळे तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात क्रांती निर्माण होतेय असंही त्यांनी सांगितलं. 

काय आहेत फिचर्स?

  • Omen Transcend 14 - एचपीतर्फे पहिला एआय अंतर्भूत ओमेन लॅपटॉप
  • गेमिंगसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर- जे युजर्स गेमिंग आणि कंटेट क्रिएशनचं काम करतात त्यांच्यासाठी हा लॅपटॉप उपयुक्त ठरणार
  • प्रोसेसर- हे इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 4060 ग्राफिक्ससह येते, ज्यामध्ये पुन्हा डिझाइन केलेले चेसिस आहे, जे थर्मल अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करू शकते
  • ओमेम ट्रान्सेंड १४ इंटेल आणि NVIDIA प्रोसेसर्समुळे लोकल एआय, बिल्ट इन एआय अशी दोन्ही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात
  • लाइव्ह ट्रान्सक्रिप्ट, व्हिडीओ कॉल दरम्यान रिअल-टाइम कॅप्शन इत्यादी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
  • AI तंत्रज्ञानामुळे नोट्स काढणं, एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करणं ही कामंसुद्धा सहज होऊ शकतात.
  • १४ इंची गेमिंग लॅपटॉप जो आतापर्यंतचा सर्वात हलका लॅपटॉप आहे
  • डिस्प्ले- HP Omen Transcend 14 लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह 2.8K रिझोल्यूशनसह जोडलेला आहे. त्याचा डिस्प्ले IMAX Enhanced प्रमाणित आहे.
  • बॅटरी आणि चार्जर- हा लॅपटॉप 140W USB-C अडॅप्टरसह चार्जिंगला सपोर्ट करतो. लॅपटॉपला एका चार्जवर ११.५ तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते.
  • कनेक्टिव्हिटी- या लॅपटॉपच्या मागील बाजूस HDMI 2.1 आउटपुटसह USB-C पोर्ट आहे. यात थंडरबोल्ट 4 USB-C पोर्ट आणि दोन USB-A पोर्ट देखील आहेत.

HP Envy x360 फिचर्स

  • डिव्हाइसमध्ये इंटेल कोअर अल्ट्रा 5 प्रोसेसर 125U आणि GPU साठी इंटेल आर्क इंटिग्रेटेड ग्राफिक्स आहेत.
  • लॅपटॉप Windows 11 होम प्री-इंस्टॉलसह येतो.
  • या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर्स आहेत त्यामुळे अडोब फोटोशॉप वापरणाऱ्यांची मोठी सोय होणार
  • स्लिक आणि स्टायलिश असून ३६० डिग्रीमध्ये रोटेट होऊ शकतो. 
  • AI मुळे व्हिडिओ कॉलिंगमध्ये Automatic Framing साठी उत्तम फिचर्स, बॅकग्राऊंड ब्लर, Eye Contact, WIFI 7 सपोर्ट

 

जाणून घ्या किंमत?

HP Omen Transcend 14 हा एचपीच्या सर्व स्टोअर्स मध्ये आणि ऑनलाईन स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत १७४,९९९ पासून सुरू होते आणि तो सिरॅमिक व्हाईट, शॅडो ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. तर एचपी HP Envy x360 14 याची किंमत ९९,९९९ पासून सुरू होते. तो मेटॉरिक सिल्व्हर आणि ॲटमॉस्फरिक ब्ल्यू या रंगात उपलब्ध आहे. 

HP Omen Transcend 14 आणि एचपी Envy x360 14 या दोन्ही लॅपटॉपमध्ये AI च्या वापरामुळे उत्पादकता वाढेल. ओमेन ट्रान्सेंड १४ मुळे गेमिंगचा अनुभव आणखी चांगला होईल, पर्सन्लाईज्ड होईल. एआय असल्यामुळे हे शक्य झालं आहे. तसंच एआय बेस्ड ऑडिओ आणि व्हिडिओ असल्यामुळे एचपी Envy x360 14 यामुळे कंटेट क्रिएशनच्या क्षेत्रात क्रांती येईल असं एचपी इंडियाचे कन्झ्युमर सेल्सचे वरिष्ठ संचालक विनित गेहलानी यांनी सांगितले. 

टॅग्स :laptopलॅपटॉप