शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ  

By सिद्धेश जाधव | Updated: April 13, 2022 13:42 IST

HP Chromebook x360 14a लॅपटॉप भारतात इंटेल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.  

HP Chromebook x360 14a लॅपटॉपचा नवीन व्हर्जन भारतात आला आहे. याआधी AMD 3015Ce प्रोसेसरसह येणारा हा क्रोमबुक आता Intel Celeron प्रोसेसरसह भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 4GB RAM, टच स्क्रीन, 14 तासांची बॅटरी लाईफ आणि 360 डिग्री फोल्डेबल डिजाइन मिळते. चला जाणून घेऊया याची किंमत स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

HP Chromebook x360 14a (Intel) चे स्पेसिफिकेशन्स 

एचपीच्या या नव्या क्रोमबुकमध्ये 14 इंचाचा एचडी रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळतो. ही एक टच स्क्रीन आहे, तसेच यात x360 कंवर्टिबल हींज देण्यात आलं आहे. त्यामुळे या क्रोमबुकचा वापर एक टॅबलेट म्हणून देखील करता येऊ शकतो. यात Intel Celeron N4120 ची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते.  

हा लॅपटॉप विद्यार्थ्यांचा विचार करून बनवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या लॅपटॉपमध्ये Chrome OS आहे त्यामुळे यात गुगल अ‍ॅप्स चालतात. तसेच कामं सोप्पी करण्यासाठी गुगल असिस्टंट देखील मिळतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी या क्रोमबुकमध्ये HD कॅमेरा देण्यात आला आहे, जो 88 डिग्री लेन्सला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप सिंगल चार्ज 14 तासांची बॅटरी लाइफ देतो, असा दावा कंपनीनं केला आहे.  

HP Chromebook x360 14a (Intel) ची किंमत 

HP Chromebook x360 14a (Intel) ची किंमत भारतात 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप Mineral Silver, Ceramic White आणि Forest Teal कलरमध्ये विकत.  याची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून हा लॅपटॉप 1 मेपासून विकत घेता येईल. 

टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान