this is how you can change your photo on aadhaar card follow these methods | आधार कार्डवरील फोटो बदलायचाय? 'या' स्टेप्स करतील मदत
आधार कार्डवरील फोटो बदलायचाय? 'या' स्टेप्स करतील मदत

नवी दिल्ली - आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत चुका असतात. त्या बदलता येतात. तसेच आधार कार्डवरील फोटो देखील काही वेळा थोडा काळा असतो. त्यामुळे तो फोटो बदलायचा असल्यास काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

फोटो बदलण्याची पहिली पद्धत 

- जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा. 

- आधार अपडेट/करेक्शन फॉर्म घेऊन त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती नीट भरा. 

- नोंदणी केंद्रवरील कर्मचाऱ्यांकडून बोटांचे ठसे आणि डोळ्यांचं स्कॅनिंग केलं जाईल आणि नवा फोटो काढला जाईल. 

- आधार अपडेट/करेक्शन फी (जवळपास 25 रुपये + जीएसटी) जमा करा. 

- यूआरएन सोबत मिळणारी स्लीप जपून ठेवा. 

- URN सोबत एक स्लिप देण्यात येईल. ती नीट जपून ठेवा.  

- URN च्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेटचं स्टेटस चेक करू शकता.

- दुरुस्ती केलेले आधार कार्ड, त्यावर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवले जाते किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करता येते. 

फोटो बदलण्याची दुसरी पद्धत 

- आधार नोंदणी केंद्रावर स्वतः जाऊन आधार दुरुस्ती करणे शक्य नसेल, तर विनंती पत्र लिहून प्रादेशिक कार्यालयात पाठवा. 

- पत्र पाठवण्याआधी आधार नोंदणी केंद्रावर जाऊ न शकण्याचं कारण योग्य असणं गरजेचं आहे. 

- पत्रासोबत आधार अपडेट/करेक्शन फॉर्म पाठवणं गरजेचं असणार आहे. 

- तुम्हाला हवा असलेला फोटो, आधार कार्डची एक कॉपी आणि पत्र पाठवा.

- 15 ते 20 दिवसांत आधार कार्डवर देण्यात आलेल्या पत्त्यावर नवीन फोटोसह नवं आधार कार्ड येईल. 

'या' गोष्टीशिवाय आधार डाऊनलोड किंवा प्रिंट करणे अशक्य

आधार ओळखपत्र आता देशामध्ये महत्वाचे कागदपत्र ठरले आहे. न्यायालयाने आधार सक्ती करण्यास नकार दिलेला असला तरीही ओळखपत्र म्हणून आधारचा वापर सरकारी कामांमध्ये होत आहे. तुम्ही जर आधार ओळखपत्रासाठी अद्याप अर्ज केला नसाल तर जवळच्या पोस्टामध्ये जाऊन आधारसाठी अर्ज करावा. तसेच यावेळी तुमचा रहिवासाचा पत्ता, जन्म प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जर तुम्ही आधीच आधार कार्डसाठी अर्ज केला असेल आणि ते आले नसेल तर तुम्ही UIDAI वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एक काम आणखी करावे लागणार आहे. तुमचा मोबाईल नंबर जर आधार काढतेवेळी नोंद केलेला नसेल तर तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड किंवा प्रिंट करता येणार नाही. यामुळे आधार नोंदणीवेळी तुमचा नंबर देणे आवश्यक असणार आहे. 

 


Web Title: this is how you can change your photo on aadhaar card follow these methods
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.