WhatsApp हा जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. त्यावर तुम्हाला मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंगसह सर्व फीचर्स मिळतील. WhatsApp मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
असंच एक खास फीचर म्हणजे मल्टी अकाउंट. या फीचरचा वापर करून तुम्ही एकाच स्मार्टफोनवर दोन WhatsApp अकाउंट वापरू शकता. आता तुम्हाला वाटेल की, अशी सुविधा अनेक अँड्रॉइड फोनमध्ये आधीच उपलब्ध होती. जेव्हा लोक WhatsApp क्लोन करून वापरायचे.
आपण आता ज्या फीचरबद्दल बोलत आहोत त्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही App ची किंवा WhatsApp क्लोनची आवश्यकता नाही. हे WhatsApp चं एक नवीन फीचर आहे. हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला WhatsApp लाँच करावं लागेल आणि नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करावं लागेल.
तुम्हाला तुमच्या प्रोफाइलसोबत एक प्लस चिन्ह दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावं लागेल. दुसरं अकाऊंट जोडण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर नवीन अकाउंटचा पर्याय दिसेल. याच्यामदतीने दुसरा नंबर एड करा. ही प्रक्रिया नवीन अकाउंट सेट करण्यासारखी असेल. तुमच्या प्रोफाइलवर जाऊन तुम्ही दोन्ही अकाउंट सहजपणे स्विच करू शकाल.