शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘वर्क फ्रॉम होम’ करताना कंपनीला कसे गंडवावे?, व्हायरल व्हिडिओची जगभर चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 07:01 IST

कोरोनानं अख्ख्या जगाला हतबल केलं. सर्व जणांना सक्तीनं घरात बसायला लावलं. अर्थव्यवस्थेचा पार बोऱ्या वाजवला आणि जग अनेक दशकं मागे फेकलं गेलं.

कोरोनानं अख्ख्या जगाला हतबल केलं. सर्व जणांना सक्तीनं घरात बसायला लावलं. अर्थव्यवस्थेचा पार बोऱ्या वाजवला आणि जग अनेक दशकं मागे फेकलं गेलं. त्या धक्क्यातून जग अजूनही सावरलेलं नाही; पण तरीही कोरोनाकाळात सगळं काही वाईटच झालं असं नाही. काही चांगल्या गोष्टीही झाल्या. त्यातलीच एक म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’! अचानक आलेल्या या अवकाळी मंदीनं जग कधी सावरेल, अशी भीती असताना जगातल्या बहुतांश कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना आधार दिला तो वर्क फ्रॉम होमनंच; पण या ‘वर्क फ्रॉम होम’चे अनेक ‘घोटाळे’ही आता बाहेर येताहेत. एका चांगल्या हेतूनं सुरू झालेल्या पद्धतीचाही लोक कसा फायदा घेतात, ते व्हायरल होऊ लागलं आहे. 

त्याचाच एक व्हिडिओ सध्या जगभर फिरतो आहे.  या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओला पसंती तर दिलीच; पण काहींनी कंपन्यांना उल्लू कसं बनवायचं याचे काही ऑनलाइन धडेही दिले.

खरं तर कोरोनाकाळात अनेक कंपन्या तगल्या आणि लक्षावधी कर्मचाऱ्यांना पोटापाण्याचा आधार दिला तो वर्क फ्रॉम होमनंच. कंपन्या आणि कर्मचारी; असा दोघांचाही त्यामुळे फायदा झाला. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिल्यामुळे कंपन्यांचा अनेक प्रकारचा खर्च वाचला, तर कर्मचाऱ्यांचाही जाण्या-येण्याचा वेळ वाचला आणि आपल्या सोयीच्या वेळेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली... पण याच ‘संधी’चा काहींनी फायदाही घेतला.त्याचं झालं असं..

हा जो व्हिडिओ ऑनलाइन फिरतो आहे, त्यात इटलीच्या कॅफेत गेलेला एक माणूस  दिसतो. कॅफेत गेल्या गेल्या टेबलासमोरची खुर्ची ओढून त्यावर तो बसतो. आपल्या बॅगेतून लॅपटॉप काढतो. समोरच्या टेबलवर ठेवतो. फोल्ड केलेला हिरव्या रंगाचा एक कागद बॅगेतून बाहेर काढतो, आपल्या डोक्याच्या मागे लावतो आणि झूम मिटिंग सुरू करतो. बॅकड्रॉपला त्यानं लावलेल्या हिरव्या रंगाच्या कागदामुळे तो कुठे बाहेर नसून आपल्या घरातच आहे, असा फिल येतो...

अर्थातच हा व्हिडिओ ‘खरा’ असला, तरी तो ‘बनावट’ आहे! म्हणजे ती व्यक्ती खरी आहे, झूम मिटिंग खरी आहे; पण आपण घरी बसून काम करीत आहोत, असा जो फिल त्या व्यक्तीनं आणला आहे, तो खरा नाही. कारण तो त्याच्या घरी, अगदी त्याच्या शहरातही नसून इटलीला फिरायला गेला आहे. वेळच्या वेळी झूम मिटिंग्ज अटेंड करून त्याच्या कंपनीच्या लोकांना, कलिग्जना मात्र तो भासवतो आहे, मी ‘कामावर’ आहे! 

‘इएफ अल्टिमेट ब्रेक’ या ट्रॅव्हल ग्रुपनं हा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला आहे. काही तासांतच या व्हिडिओला तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि हजारो लोकांनी आपापल्या ‘टिप्स’ टाकून इतरांशी तो शेअरही केला..

आपणही आपल्या कंपनीला आपण कामावर असल्याचं भासवून कसं उल्लू बनवलं किंवा बनवता येतं, याचे ऑनलाइन धडेही काहींनी दिले आहेत. जो मॅकडोनल्ड या यूजरनं तर मालकांना उल्लू बनवण्याची एक अफलातून ट्रिक युजर्ससाठी शेअर केली आहे. आपण सतत ‘ऑनलाइन’ आहोत, काम करत आहोत, हे भासवण्यासाठी ‘मी’ काय करतो, हे सांगताना त्यानं आपल्या ‘आयडिया’चा फोटोच शेअर केला. ‘रुम्बा’ हा घराची साफसफाई करणारा रोबोट..

व्हॅक्यूम क्लीनरच, पण ‘स्वत:च’ काम करणारा. आपण ऑनलाइन आहोत हे भासवण्यासाठी आपण काय करताे, हे जो मॅकडोनल्डनं स्पष्ट केलं आहे. त्याच्याकडे असलेल्या रुम्बा या रोबोटलाच त्यानं आपला माऊस बांधून ठेवला. मॅकडोनल्डचं म्हणणं आहे, या युक्तीनं माझं तिहेरी काम होतं. एकाचवेळी माझं घर साफ होतं, रुम्बा सारं काही चकाचक करून ठेवतो, रुम्बाबरोबर माऊसही फिरत असल्यानं मी ‘ऑनलाइन’ आहे, असं कंपनीला, माझ्या बॉसला, माझ्या कलिग्जना वाटत राहातं, त्याचवेळी मी मात्र काही काम न करता टाइमपास करू शकतो, बाहेर फिरू शकतो किंवा आराम करू शकतो! तुम्हाला मी ‘ॲक्टिव्ह’ हवा आहे ना, मग हा घ्या माझा ॲक्टिव्हपणा!..

यूजर्सनी दिल्या आणखी ‘टिप्स’!कामचुकारपणा करून इटलीत फिरायला गेलेल्या त्या कर्मचाऱ्याला उद्देशून काहींनी अतिरिक्त टिप्सही दिल्या आहेत आणि त्यानं केेलेल्या चुकांबद्दल त्याची कानउघाडणीही केली आहे. एका यूजरनं म्हटलं आहे, तू भले आपला बॅकड्रॉप बदलला, आपण घरून काम करतोय असं भासवलंस, पण ज्या भर गर्दीतल्या कॅफेमध्ये तू झूम मिटिंगला बसला होतास तिथल्या गोंगाटाचं काय? त्यामुळे ते तुझं घर नाही, हे ऑफिसमधल्या लोकांना नक्की कळेल. त्यासाठी तू आवाज म्यूट ठेवायला हवा, शांत लोकेशन निवडायला हवं होतं. काहींनी सांगितलं, अशावेळी आपला कॅमेराही बंद ठेवायला हवा, काहींनी सावध केलं की, बऱ्याच कंपन्यांची ‘आयपी फिल्टर’ पॉलिसी असते आणि त्यांच्याकडे ‘जिओ सिक्युरिटी’ही असते, त्यामुळे आपली चोरी पकडली जाऊ शकते. अशा गोष्टींमुळे चांगल्या गोष्टीही बदनाम होतात, हे मात्र खरं, याबद्दलही अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल