शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Google Photos मधून डिलीट झालेले फोटो असे करा रिस्टोर; जाणून घ्या पद्धत 

By सिद्धेश जाधव | Updated: August 31, 2021 19:41 IST

How To Restore Deleted Google Photos: गुगल फोटोजमधून चुकून डिलीट झालेले फोटोज किंवा व्हिडीओज डिलीट झाल्यास गोंधळून जाण्याचे कारण नाही. तुम्ही सहज डिलीट केलेले फोटोज आणि व्हिडीओज रिस्टोर करता येतील.  

फोटोज आणि व्हिडीओज बॅकअप ठेवण्यासाठी अँड्रॉइडसह आयओएस युजर देखील Google Photos चा वापर करतात. ही गुगलची क्लाऊड स्टोरेज सेवा आहे. परंतु कधी कधी या ऑनलाईन स्टोरेजमध्ये साठवून ठेवलेले फोटोज किंवा व्हिडीओ चुकून डिलीट होतात. असे झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. Google Photos वरून डिलीट झालेल्या फाईल्स Trash फोल्डरमध्ये जातात. त्यामुळे डिलीट झालेले फोटो कायमस्वरूपी डिलीट होण्याआधी 60 दिवस या फोल्डरमध्ये राहतात. इथून या फाईल्स रिकव्हर करता येतात. फक्त यासाठी Google Photos चे Back UP आणि Sync आधीच फीचर एनेबल असले पाहिजे.  

Google Photos मधून डिलीट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे  

सर्वप्रथम गुगल फोटोजच्या Trash Folder मध्ये जाऊन तिथे तुम्ही डिलीट केलेला फोटो किंवा व्हिडीओ आहे कि नाही बघा. ट्रॅश फोल्डरमध्ये नसलेली मीडिया फाईल रिस्टोर करता येत नाही. तसेच ज्या फोटोचा तुम्ही बॅकअपच घेतला नाही आणि तो जर फोन मेमरीमधून डिलीट केला तरी देखील तो फोटो रिस्टोर करता येणार नाही. Trash Folder मधील फोटो रिस्टोर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.  

  • Android आणि iOS डिवाइसवरून फोटो रिस्टोर करण्यासाठी Google Photos App ओपन करा. 
  • त्यानंतर सर्वात खाली Libary च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि Trash Folder मध्ये जा. 
  • जो फोटो किंवा व्हिडीओ रिस्टोर करायचा आहे तो शोधा. आता त्या फोटो किंवा व्हिडीओला टच आणि होल्ड करून सिलेक्ट करा. एकापेक्षा जास्त फोटोज असल्यास त्या सर्व मीडिया फाईल सिलेक्ट करा.  
  • आता स्क्रीनवर खालच्या बाजूला Restore ऑप्शन दिला असेल त्यावर क्लिक करा. 
  • हा फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा तुमच्या फोनच्या फोटो गॅलेरी अ‍ॅप आणि अल्बम मध्ये येईल. 

कम्प्यूटरवरून गुगल फोटोजमधील फोटो रिस्टोर करण्यासाठी  

  • सर्वप्रथम ब्राउजरमधून photos.google.com ओपन करा. 
  • तिथे डावीकडे Trash Folder वर क्लिक करा. 
  • जो फोटो किंवा व्हिडीओ रिस्टोर करायचा असेल तो सिलेक्ट करा.  
  • त्यानंतर Restore वर क्लिक करून तो फोटो गुगल फोटो लायब्ररी मध्ये किंवा अल्बममध्ये रिस्टोर करा.  
टॅग्स :googleगुगल