शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एका व्हिडिओवर २०,००० व्ह्यूज मिळाले तर किती पैसे देते YouTube? जाणून घ्या कमाईचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:39 IST

जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तर युट्यूबच्या कमाईचे गणित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या डिजिटल युगात युट्युबर होणे हा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की प्रसिद्धी मिळतेच, पण त्यातून नेमकी कमाई किती होते? जर तुमच्या व्हिडीओला २०,००० व्ह्यूज मिळाले, तर तुमच्या खिशात किती पैसे येतील? जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तर युट्यूबच्या कमाईचे गणित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण इथे मिळणारा पैसा हा केवळ व्ह्यूजवर नाही, तर जाहिराती, कन्टेन्टची श्रेणी आणि प्रेक्षक कोणत्या देशातून पाहतात, यावर अवलंबून असतो.

२०,००० व्ह्यूजवर किती होणार कमाई?

२०२६च्या ताज्या अंदाजानुसार, युट्यूबवर १,००० व्ह्यूजमागे साधारणपणे ५० ते २०० रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. या हिशोबाने जर तुमच्या व्हिडीओला २०,००० व्ह्यूज मिळाले, तर तुम्हाला १,००० ते ४,००० रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो.

मात्र, जर तुमचे चॅनल जुने आणि प्रस्थापित असेल, तर ही कमाई लाखांच्या घरात जाते. १० लाख व्ह्यूज मिळाल्यास साधारण ५०,००० ते २,००,००० रुपये आणि १ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडल्यास तब्बल २० लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. पण लक्षात ठेवा, यासाठी तुमचे चॅनल 'YouTube Partner Program'मध्ये पात्र असणे अनिवार्य आहे.

काय आहे CPM आणि RPMची भानगड?

युट्यूबची कमाई दोन मुख्य शब्दांभोवती फिरते:

CPM (Cost Per Mille): जाहिरातदार दर १,००० जाहिरातींच्या व्ह्यूजसाठी युट्यूबला जे पैसे देतात, त्याला CPM म्हणतात. भारतात हे प्रमाण साधारण २० ते १५० रुपयांच्या दरम्यान असते.

RPM (Revenue Per Mille): युट्यूब आपला हिस्सा कापून घेऊन क्रिएटरला १,००० व्ह्यूजमागे जो पैसा देते, त्याला RPM म्हणतात. यामध्ये केवळ जाहिरातीच नाही, तर चॅनल मेंबरशिप, सुपरचॅट आणि युट्यूब प्रीमियममधून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश असतो.

कमाईवर परिणाम करणारे घटक

युट्यूबवर सगळ्यांनाच सारखे पैसे मिळत नाहीत. जर तुमचा व्हिडीओ फायनान्स किंवा टेक विषयावर असेल, तर कमाई जास्त होते. याउलट कॉमेडी किंवा व्लॉग्सवर कमी पैसे मिळू शकतात. तसेच, जर तुमचे व्हिडीओ अमेरिका किंवा युरोपमध्ये पाहिले जात असतील, तर भारतीय प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला जास्त डॉलर मिळतात. व्हिडिओवर केवळ व्ह्यूज वाढवून चालत नाही, तर दर्जेदार कन्टेन्ट आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हाच युट्यूबवर श्रीमंत होण्याचा खरा मार्ग आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : YouTube Earnings: How Much Money Do 20,000 Views Get You?

Web Summary : YouTube earnings depend on views, ads, content, and audience location. 20,000 views can earn ₹1,000-₹4,000. Finance/tech videos and US/European viewers yield higher revenue. Quality content and targeted reach are key for YouTube success.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान