शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक 

By सिद्धेश जाधव | Updated: August 17, 2021 19:42 IST

जर तुम्हाला फेसबुकवरील तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स अनोळख्या लोकांपासून लपवून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचे फेसबुक प्रोफाइल लॉक करू शकता.  

भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मम्हणजे Facebook. या प्लॅटफॉर्मचा वापर युजर्स मित्र आणि कुटुंबियांशी ऑनलाईन संपर्कात राहण्यासाठी करतात. अनेकजण या सोशल मीडियाचा वापर अनोळखी लोकांशी मैत्री करण्यासाठी करतात. परंतु काही लोकांना अश्याच अनोळखी लोकांपासून लांब राहायचे असते. जर तुम्हाला देखील तुमच्या फेसबुक पोस्ट आणि फोटो अनोळखी लोकांपासून लपवायचे असतील तर तुम्ही फेसबुकच्या प्रायव्हसी फीचर्स वापर करू शकता.  

फेसबुकवर कोणीही तुमचं नाव शोधून प्रोफाइल प्रोफाइल बघू शकतं. लोकांना असे करण्यापासुन रोखण्यासाठी तुम्ही प्रोफाइल लॉक करू शकता. प्रोफाइल लॉक केल्यावर कोणीही तुमचे फोटो बघू शकत नाही किंवा डाउनलोड करू शकत नाही. लॉक झालेल्या प्रोफाइलवरील पोस्ट, स्टोरीज, फोटोज आणि प्रोफाइल फोटो फक्त फ्रेंड लिस्टमधील मित्र मैत्रीणीना दिसतात.  

Facebook Profile लॉक करण्यासाठी  

  • फेसबुकच्या मोबाईल अ‍ॅप आणि ब्राऊजरमधून सुद्धा तुम्ही प्रोफाइल लॉक करू शकता. पुढे दोन्ही पद्धती सांगितल्या आहेत.  
  • Mobile App मधून फेसबुक प्रोफाइल लॉक करण्यासाठी  
  • सर्वप्रथम Facebook अ‍ॅप ओपन करा. त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. 
  • आता Edit Profile च्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. समोर आलेल्या ऑप्शन पैकी Lock Profile ऑप्शन निवडा. 
  • पुढल्या पानावर या फीचरची माहिती दिली जाईल. त्याच पेजवर खाली असलेल्या Lock My Profile वर क्लिक करा. म्हणजे तुमचं प्रोफाइल लॉक होईल. 

ब्राऊजरमधून असे करा प्रोफाइल लॉक 

लॅपटॉप ब्राउजरमध्ये फेसबुक प्रोफाइल लॉक करण्यासाठी कोणताही ऑप्शन मिळत नाही. 

  • तुम्हाला ब्राऊजरमध्ये m.facebook.com वर जाऊन तुमच्या प्रोफाइल पेजवर जावे लागेल.  
  • आता तुम्ही डेस्कटॉप मोडवरून मोबाईल व्हर्जनवर याला. आता तिथे मोबाईल प्रमाणे तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा आणि वर सांगितल्याप्रमाणे प्रोफाइल लॉक करा. 
  • iOS युजर देखील अश्याप्रकारे लॅपटॉपवरून प्रोफाइल लॉक करू शकतात.  

प्रोफाइल अनलॉक कसे करावे? 

जर तुम्हाला फेसबुक प्रोफाइल अनलॉक करायचे असेल तर वरील स्टेप्स फॉलो करा. जर तुम्ही प्रोफाइल लॉक केले असेल तर तुम्हाला Lock Your Profile च्या जागी Unlock your Profile चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रोफाइल अनलॉक करू शकाल. 

टॅग्स :FacebookफेसबुकAndroidअँड्रॉईड