शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
2
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
3
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
4
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
5
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
6
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
7
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
8
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
9
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
10
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
11
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
12
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
13
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
14
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
15
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
16
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
17
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
18
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
19
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
20
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

होम डिलिव्हरी करायला येणार रोबो !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:55 AM

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे.

एकेकाळी आपल्या देशात फक्त दूध, वर्तमानपत्र आणि फार तर किराणा सामान यांची होम डिलिव्हरी होत असे किंवा भाजीवाला घराच्या दारापर्यंत येत असे.  बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपणही बदललो अन् होम डिलिव्हरी सेवेमार्फत आपण गरजेच्या सर्वच वस्तू मागवायला शिकलो. कोरोनाकाळात तर या सेवेला जगभरातच प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या भीतीने काही लोक ही सेवा वापरायलादेखील कचरत आहेत. त्यामुळे होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्यांनीदेखील यावर ड्रोनने घरपोहोच माल पोहोचवण्यासारख्या नव्या नव्या कल्पना लढवायला सुरुवात केली आहे. माणसाशी येणारा प्रत्यक्ष संपर्क यामुळे टाळता येतो, हा यातला प्रमुख मुद्दा !

सिंगापूरची कंपनी असलेल्या OTSAW Digital ने घरोघरी जाऊन भाजीपाला, दूध, अंडी ह्यांचीडिलिव्हरी देणारा एक रोबोच बनवला आहे. त्याला Camello असे नाव देण्यात आले आहे. एक वर्षभरासाठी याची प्रत्यक्ष चाचणी होणार असून, ह्या काळात सुमारे ७०० घरात त्याच्या मार्फत रोजच्या वापरातील वस्तू घरपोच पोचवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे एका ॲपच्या माध्यमातून प्रथम ग्राहकांना आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंचे प्री बुकिंग करावे लागेल. ऑर्डर एकदा कन्फर्म झाली की, ठरलेल्या वेळेवरती हा रोबो तुमच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अथवा तुमच्या घराजवळील विशिष्ट पिकअप पॉईंटवर सामानाची डिलिव्हरी देईल. हा रोबो निर्धारित ठिकाणावरती पोहचला की, ग्राहकांना त्यांच्या ॲपद्वारे त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होईल. 

या सर्व प्रक्रियांना नीट हाताळण्यासाठी या रोबोमध्ये हाय रेझोल्यूशन कॅमेरा, ३ डी सेंसर्स आणि सुमारे २० किलो वजन वाहून नेता येईल असे दोन कंपार्टमेंट देण्यात आले आहेत. एका दिवसात चार ते पाच डिलिव्हरी करण्यासाठी हा रोबो सक्षम आहे. शनिवारी मात्र याची सेवाफक्त अर्धा दिवसच उपलब्ध असणार आहे. या रोबोची विशेष खासियत म्हणजे, प्रत्येक डिलिव्हरीनंतर हा रोबो स्वत:ला अल्ट्राव्हायलट लाईटच्या मदतीने संपूर्ण सॅनिटायझ करणार आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अशा पद्धतीने आरोग्याच्या पूर्ण सुरक्षेची खात्री देत आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत दिली जाणारी ही सेवा सध्या जगभरच चर्चेचा विषय बनलेली आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान