शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'पोकेमॉन गो'प्रमाणे येणार हॅरी पॉटर गेम

By शेखर पाटील | Published: November 13, 2017 12:32 PM

जगभरातील कोट्यवधी गेमर्सला वेड लावणा-या पोकेमॉन गोप्रमाणेच आता हॅरी पॉटर मालिकेचे मायावी विश्‍वदेखील गेमच्या स्वरूपात येणार आहे.

निअँटीक लॅबने सादर केलेल्या पोकेमॉन गो गेमला जगात अभूतपुर्व प्रतिसाद लाभला आहे. अर्थात पहिल्या काही महिन्यांमध्ये या गेमबाबत तयार झालेला हाईप बर्‍याच प्रमाणात कमी झाला असला तरी याची युजर्स संख्या सातत्याने वाढत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातून निअँटीक लॅबला मोठ्या प्रमाणात उत्पन्नदेखील मिळू लागले आहे. याच्या विविध आवृत्त्यादेखील सादर करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, निअँटीक लॅबने हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेम या नावाने नवीन गेम सादर करण्याची घोषणा केली आहे. वॉर्नर ब्रदर्स इंटरअ‍ॅक्टीव्ह एंटरटेनमेंट आणि डब्ल्यूबी गेम्स यांच्या सहकार्याने हा नवीन गेम लाँच करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

निअँटीक लॅबने आपल्या या आगामी गेमबाबत फारशी माहिती वा टिझर प्रदर्शीत केलेला नाही. तथापि, एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची प्राथमिक माहिती दिली आहे. पोकेमॉन गो हा गेम ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) म्हणजेच विस्तारीत सत्यतेवर आधारित आहे. याचप्रमाणे हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेमही एआरवरच आधारित असेल. पोकेमॉन गो या गेममध्ये आपल्या भोवताली असणार्‍या विविध प्राण्यांना पकडायचे असते. याच पध्दतीने हॅरी पॉटर गेममध्ये या मालिकेतील विविध दुष्ट प्रवृत्तीच्या पात्रांशी लढण्याची संधी मिळणार आहे. पोकेमॉन गो प्रमाणेच हे सर्व खलनायक आपल्या भोवती विविध ठिकाणी दडून बसणार आहेत.

अर्थात यांचा अतिशय चित्तथरारक पध्दतीने सामना करण्याची संधी गेमर्सला या माध्यमातून मिळणार आहे. यात वैयक्तिक आणि सांघीक या दोन्ही पातळीवरून खेळण्याची सुविधा असेल.  निअँटिक लॅबने सुमारे पाच वर्षापूर्वी सादर केलेल्या इनग्रेस या गेमप्रमाणेच हॅरी पॉटर गेमची संरचना असेल असे जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे जगभरातील गेमर्समध्ये कुतुलहाचे वातावरण निर्मित झाले आहे. दरम्यान, या नवीन गेममुळे पोकेमॉन गो गेमचे होणार तरी काय? हा प्रश्‍न गेमर्स विश्‍वातून विचारला जात आहे. यावर निअँटीकने हे दोन्ही स्वतंत्र गेम असून पोकेमॉनच्या विविध आवृत्त्या येतील अशी ग्वाही देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार २०१८च्या प्रारंभी हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेम लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान