शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:24 IST

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात.

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. Apple जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे आयफोन विकते आणि याचा बहुतांश उत्पादन चीनमध्ये होतं. 

चीन आयफोनचा सर्वात मोठा निर्माता देश आहे. पण आता ही आकडेवारी वेगानं बदलू लागली आहे. नव्या रिपोर्टनुसार साल २०२७ पर्यंत जगभरात एकूण विक्री होणाऱ्या iPhone पैकी निम्मे आयफोन 'मेड इन इंडिया' असतील. याआधीही यासंदर्भातील एक अहवाल समोर आला होता. ज्यात २०२५ पर्यंत जगभरातील एकूण २५ टक्के आयफोन भारतात बनणार असल्याचा दावा करण्यात आला होता. याची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर चीनमध्येही होत आहे. 

Apple कडूनही चीनमधील उत्पादनात केली जातेय घटअ‍ॅपल कंपनी आता चीनवरचं अवलंबीत्व कमी करू पाहत असल्याची जाणीव आता चीनलाही झाली आहे. कंपनीच्या या भूमिकेचा फायदा भारत आणि व्हिएतनामला होत आहे. Apple कंपनीच्या चीनच्या बाजारपेठेवरील अवलंबित्वाच्या बातम्या आपण याआधीपासूनच पाहात आलो आहोत. मग कोरोना महामारीमुळे याचं चित्र आता पूर्णपणे बदललं आहे. चीनमधील कोरोना विस्फोटामुळे चीनमधील आयफोनच्या फॅक्ट्रीमधील उत्पादनावरही मोठा परिणाम झाला. दर आठवड्याला कंपनीला अब्जावधी डॉलरचं नुकसान भोगावं लागलं आहे. 

अ‍ॅपल कंपनीकडून चीनवरील अवलंबित्व गेल्या वर्षापासून हळूहळू कमी केलं जात आहे. दुसरीकडे भारत एक असा देश आहे जिथं सर्वात मोठं उत्पादन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. गेल्या वर्षी Apple नं सप्टेंबरमध्ये iPhone 14 चं उत्पादन भारतात सुरू केलं. 

भारतात तयार होणार लेटेस्ट आयफोनकंपनी चीन आणि भारतात अशा दोन्ही ठिकाणी आयफोन-१४ चं उत्पादन करण्यास इच्छुक होती. पण असं होऊ शकलं नाही. चीनमधील कोरोना परिस्थिती यामागचं मोठं कारण समजलं जात आहे. आता आयफोन-१५ च्याबाबतीतही असंच होऊ शकतं. एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या २.२७ टक्के Apple कंपनीची सप्लायर फॅसिलीटी आहे. म्हणजे भारत आयफोन उत्पादनाच्या बाबतीत ८ व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, चीन, जपान, युके, तैवान, फ्रान्स आणि द.कोरिआचा नंबर लागतो. पण हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. साल २०२७ पर्यंत जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा 'मेड इन इंडिया' असेल. 

टॅग्स :Apple Incअॅपलchinaचीन