शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

Facebook अन् YouTube ला भारत सरकारनं फटकारलं, स्पष्ट शब्दात दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 20:38 IST

केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खोट्या बातम्या आणि डीपफेकसंदर्भात कडक इशारा दिला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबला भारत सरकारने स्पष्ट शब्दात फटकारले आहे. डीपफेक आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने या दोन्ही कंपन्यांना इशारा दिला आहे. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खोट्या बातम्या आणि डीपफेकसंदर्भात कडक इशारा दिला आहे.

लागू करावा लागेल सोशल मीडिया नियम 2022 -न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने दिग्गज सोशल मीडिया कंपन्यांसोबत एक बैठक घेतली होती. यात सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एका आठवड्याच्या आत कठोर पावले उचलण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, सोशल मीडिया नियम 2022 नुसार, सर्व सोशल मीडियांनी कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी धोकादायक असलेला कंटेन्ट आणि डीपफेक सारख्या प्रकरणांवर कठोर भूमिका घ्यायला हवी.

सरकारची सक्ती  -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, सरकार डीपफेकच्या समस्येचा सामना करण्यासाठी काम करत आहे. एआयच्या मदतीने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, फेक न्यूज पसरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर सरकार कठोर कारवाई करेल. यासाठी सरकार सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहे. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारFacebookफेसबुकYouTubeयु ट्यूबGovernmentसरकार