शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Google चा युजर्सना धोका? पॉर्न बघणाऱ्यांचा डेटा गोळा केला जातोय? प्रायव्हेट ब्राउजिंगच ‘प्रायव्हेट’ नाही  

By सिद्धेश जाधव | Updated: May 20, 2022 17:42 IST

टेक्सस कोर्टात गुगल विरोधात प्रायव्हेट मोडमध्ये युजर डेटा ट्रॅक करण्यासाठी खटला दाखल करण्यात आला आहे.  

Google वर अनेकदा डेटा गोळा करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा असाच एक आरोप करण्यात आला आहे. यावेळी टेक जायंट Incognito Mode अर्थात प्रायव्हेट ब्राउजिंग मोडमध्ये देखील युजर्सचा डेटा गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इकोग्निटो मोडचा वापर आपली हिस्ट्री ब्राऊजरमध्ये राहू नये म्हणून केला जातो.  

टेक्ससचे अ‍ॅटर्नी जनरल Ken Pexton यांनी 19 मेला गुगलच्या पॅरेंट कंपनी Alphabet Inc विरोधात खटला दाखल केला आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या केसनुसार, गुगल प्रायव्हेट मोडमध्ये ब्राउजिंग केल्यावर देखील युजरचा खाजगी डेटा कलेक्ट करतं.  

प्रायव्हेट ब्राउजिंग देखील नाही सुरक्षित 

केन पेक्सटन यांनी Google विरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही ब्राउजरचा इनकॉगनिटो मोड किंवा प्रायव्हेट ब्राउजिंग मोड सेफ ब्राउजिंगसाठी देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की कंपनीनं या मोडमधील युजरची सर्च हिस्ट्री आणि लोकेशन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक न करणं अपेक्षित असतं.  

या खटल्यानुसार, गुगल प्रायव्हेट ब्राउजिंगचा पर्याय देतं, जो खाजगी वेबसाईट बघण्यासाठी असतो ज्यात मेडिकल हिस्ट्री, पॉलिटिकल परसुएशन आणि सेक्सुअल ओरिएंटेशन इत्यादी माहिती शोधण्यासाठी या मोडचा वापर केला जातो. तसेच या मोडचा वापर ऑनलाईन जाहिरातदारांपासून दूर राहण्यासाठी देखील केला जातो.  

गुगलची प्रतिक्रिया 

Google ने केन पेक्स्टन यांचा दावा खोटा असल्याचं सांगत म्हटलं आहे की यात चुकीच्या तथ्यांचा आधार घेण्यात आला आहे. आम्ही नेहमीच युजर्सची प्रायव्हसीची काळजी घेतो आणि आपल्या प्रोडक्ट्समध्ये प्रायव्हसी फीचर जोडतो जे लोकेशन डेटासाठी कंट्रोल देते. गुगलनं आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत आणि या खटल्यात आपली बाजू मांडणार असल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :googleगुगल