शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

मस्तच! आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login; जाणून घ्या, किती सेफ आहे 'ही' पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 15:34 IST

Gmail Will Login Without Password : येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे.

नवी दिल्ली - गुगल आपली सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी नवं फीचर लॉन्च करत आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड (password) टाकण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणीही तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरुन अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओपन होणार नाही. म्हणजेच येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे. गुगल टू फॅक्टर ऑथिन्टिकेशन फीचरच्या माध्यमातून सिक्योरिटी अधिक मजबूत करणार आहे. 

लोकांना हे फीचर डिफॉल्ट मिळणार आहे. याचा अर्थ असा, की आधीसारखं आता हे ऑप्शनल किंवा पर्याय म्हणून राहणार नाही. हे फीचर तुमच्या अकाऊंटला आपोआपच लागू होईल. Google ने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता लोकांना गुगल साईन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा प्रयोग करावा लागेल. या फीचरमुळे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. कंपनीने हे फीचर त्या अकाऊंटला डिफॉल्ट सुरू होईल, जे अकाऊंट कॉनफिगर केले गेले आहेत असं देखील म्हटलं आहे. 

फीचर लागू झाल्यानंतर कोणीही तुमचं गुगल अकाऊंट तुमचं डिव्हाईस उपलब्ध असल्याशिवाय उघडू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीकडे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड असेल तरीही तो व्यक्ती गुगल अकाऊंट ओपन करू शकणार नाही. आता तुम्ही टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून अकाऊंट लॉगिन केल्यास तुमच्या फोनवर एसएमएस(SMS), व्हॉईस कॉल (voice Call) किंवा गुगल Appच्या (Google App) माध्यमातून कोड मिळेल. ब्लॉगमध्ये आता पासवर्ड चोरी होणं ही जुनी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 

येणाऱ्या काळात गुगल पासवर्डचा वापर पूर्णपणे बंद होणा आहे. याचं कारण लोक एकच पासवर्ड सगळ्या अकाऊंटला वापरतात हे आहे. टू स्टेप ऑथेन्टिकेशन किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी फिजिकल सिक्योरिटीही (Security) वापरली जाऊ शकते. फिजिकल सिक्योरिटी लॅपटॉपच्या यूएसबी पोर्ट किंवा फोनजवळ ठेवून वापरता येऊ शकते. युजरला याचा फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल