शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या.. 

By ravalnath.patil | Updated: November 23, 2020 15:21 IST

Google : नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे.

ठळक मुद्देगुगलने आपले डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पे (Google Pay) पूर्णपणे रिडिझाइन केले आहे.

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी गुगलने (Google) आपल्या खास अ‍ॅप Phone by Google चे नवीन व्हर्जन लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे. या आगामी मोबाइल अ‍ॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. तसेच, कंपनी या अ‍ॅपद्वारे Truecaller अ‍ॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

मोबाइल इंडियनच्या एका वृत्तानुसार, रेडडिटरने (Redditor ) गुगलच्या या आगामी कॉलिंग अ‍ॅप गुगल कॉलला यूट्यूबच्या जाहिरातीवर स्पॉट केले आहे. युट्यूबवर पाहिलेल्या या जाहिरातीमध्ये 'lets you answer with confidence' अशी टॅगलाइन वापरली आहे.

Google Call अ‍ॅपची लॉन्चिंगगुगलने अद्याप गुगल कॉल लाँचिंग करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे अ‍ॅप सुरू होईल, अशी आशा आहे. दरम्यान, गुगलचा फोन अ‍ॅप अँड्राईड युजर्ससाठी आहे. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे, फोन स्क्रीन लॉक झाल्यानंतरही युजर्सला कॉलरच्या नावाची माहिती समजते. कंपनीने अलीकडेच या अ‍ॅपसाठी अनेक फीचर्स जारी केले होते.

Google Pay अ‍ॅपमध्ये बदलगुगलने आपले डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पे (Google Pay) पूर्णपणे रिडिझाइन केले आहे. नवीन बदलामुळे गुगल पे युजर्सला पैशांची बचत करण्यात मदत मिळेल, असा दावा गुगलने केला आहे. तसेच, युजर्स आपल्या खर्चावर लक्ष ठेवू शकतील. मात्र, गुगलकडून सुरुवातीला गूगल पेमधील बदल हे फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी करण्यात आले आहेत. तर भारतासह जगभरातील युजर्ससाठी सुद्धा लवकरच गुगल पे संबंधी अपटेड देण्यात येतील.

गुगल पेच्या जुन्या अ‍ॅपमध्ये तुम्हाला बँक कार्ड डिटेल्स आणि अलीकडील ट्रांजक्शन होम पेजवर दिसून येत होते. मात्र, नवीन गुगल पे अ‍ॅपमध्ये केवळ ट्रांजक्शन डिटेल्स सापडणार नाही तर युजर्स आपला दररोजचा खर्च तपासून पाहू शकतात. नवीन अ‍ॅपमध्ये आपल्याला डिजिटल पेमेंटसह मेसेजिंग टूल देखील मिळेल. गूगल पेच्या अ‍ॅप रीडिझाईन अ‍ॅपमध्ये युजर्स आपल्या सर्वाधिक ट्रांजक्शन करणार्‍या लोकांना ट्रॅक करू शकतील. तसेच, तुम्ही एखाद्या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास, त्यासोबत केलेल्या सर्व जुन्या ट्रांजक्शनचे डिटेल्स दिसतील. हे चॅट क्लिक बबलमध्ये दिसून येईल. या चॅट बॉक्समध्ये आपल्याला पेमेंटचा पर्याय मिळेल. ज्याठिकाणी तुम्हाला मनी रिक्वेस्ट, बिल पाहू शकता. 

टॅग्स :googleगुगलgoogle payगुगल पे