सॅनफ्रान्सिस्को - पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (8 ऑक्टोबर) कंपनीने ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा केल्याने युजर्सला धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्सचा डेटा धोक्यात असल्याची माहिती समोर आली होती. एका विशिष्ट बगद्वारे पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे.
गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 09:35 IST