शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

गुगल खरेदी करणार एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादनाचे युनिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:51 IST

गुगल एचटीसी कंपनीचे स्मार्टफोन उत्पादनाचे युनिट खरेदी करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. 

एचटीसी ही तैवानमधील कंपनी स्मार्टफोन उत्पादनातील अग्रगण्य नाव म्हणून गणली जाते. आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत या कंपनीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात जगातील पहिला स्मार्टफोन, पहिला अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन तसेच पहिला टचस्क्रीन स्मार्टफोन उत्पादीत करण्याचे श्रेय या कंपनीला जाते. मात्र अलीकडच्या काळात या कंपनीची कामगिरी मोठ्या प्रमाणात ढेपाळल्याचेही दिसून आले. विशेष करून सॅमसंग, अ‍ॅपल, एलजी, सोनी आदींसारख्या प्रस्थापित ब्रँडसोबत चिनी कंपन्यांनी अतिशय उत्तमोत्तम स्मार्टफोन सादर करून एचटीसीला आव्हान दिले. गेल्या वर्षभरात तर एचटीसीच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एचटीसी यु ११ या मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळूनही झालेली ही घसरगुंडी कंंपनीच्या चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे. या पार्श्‍वभूमीवर एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे डील आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. 

खरं तर गुगल आणि एचटीसी कंपन्यांचे संबंध जुने आहेत. एचटीसीने गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनचे उत्पादनही केले आहे. या पार्श्‍वभूमीवर गुगलचे हे संभाव्य अधिग्रहण टेकविश्‍वात कुतुहलाचा विषय बनले आहे. अ‍ॅपल आणि सॅमसंगप्रमाणे स्वतंत्र हार्डवेअर असणारे स्मार्टफोन उत्पादीत करण्याचा प्रयत्न गुगलने मोटोरोला कंपनीला खरेदी करून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात फारसे यश आले नाही. यामुळे स्मार्टफोन उत्पादनात गुगल दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी एचटीसीचा उपयोग करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच एचटीसीच्या उच्च दर्जाच्या हार्डवेअरला अँड्रॉइडची जोड देण्याचा गुगलचा प्रयत्न असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे. विशेष बाब म्हणजे या सौद्यात व्हाईव्ह या एचटीसीच्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेटचा समावेश नसेल. या युनिटची मालकी एचटीसीकडेच राहणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान