शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एक चूक अन् थेट पोलिस तुमच्या घरात; Google वर कधीही 'या' 4 गोष्टी सर्च करू नका..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 17:08 IST

Google Search: इंटरनेटने आपले दैनंदिन आयुष्य जितके सोपे केले आहे, तितकाच मोठा धोका देखील वाढवला आहे.

Google Search: इंटरनेटने आपले दैनंदिन आयुष्य जितके सोपे केले आहे, तितकाच मोठा धोका देखील वाढवला आहे. विशेषत: Google सारख्या सर्च इंजिनवर आपण क्षणभरही न विचार करता काहीही सर्च करतो. पण आपल्याला माहिती आहे का, काही विशिष्ट शब्द, प्रश्न किंवा टॉपिक असे आहेत जे सर्च करणे थेट कायद्याच्या कारवाईपर्यंत पोचवू शकते? काही प्रकरणांमध्ये पोलिस तुमचे लोकेशन ट्रॅक करुन अटकही करू शकतात.

गूगल सर्च इतके धोकादायक का असतात?

भारतामध्ये सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया आता अतिशय कडक झाली आहे. गूगलवर आपण केलेला प्रत्येक सर्च हा एक डिजिटल ट्रेल तयार करतो. हा डेटा तांत्रिकदृष्ट्या तर ट्रॅक होतोच, पण आवश्यकता भासल्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनाही दिला जाऊ शकतो. 

कुठले सर्च टाळायला हवेत?

1. अवैध शस्त्रे किंवा स्फोटक बनवण्याचे मार्ग

बंदूक, बॉम्ब किंवा कोणतेही विस्फोटक कसे बनवावे? असा सर्च केला तर तो संभाव्य दहशतवादी कृती मानला जाते. पोलिस लोकेशन ट्रॅक करू शकतात. यात UAPA सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई होते.

2. डार्क वेब, ड्रग्ज किंवा अवैध वस्तूंची खरेदी

डार्क वेब कसे अ‍ॅक्सेस करावे?, ड्रग्स कुठे मिळतात? असे प्रश्न हा गंभीर गुन्हा मानला जातो. सायबर सेल त्वरित सक्रिय होते. अशा प्रकरणांत अनेकदा जामिनाही मिळत नाही

3. बालकांशी संबंधित अश्लील किंवा अवैध कंटेंट

जगभरात हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. शोधणे, पाहणे किंवा शेअर करणे तिन्ही बेकायदेशीर आहे. POSCO कायद्यांतर्गत कठोर कारवाई होऊ शकते.

4. कोणाचे अकाऊंट हॅक करणे किंवा प्रायव्हसी भंगाचे उपाय

WhatsApp कसे हॅक करावे?, गर्लफ्रेंडचे लोकेशन कसे ट्रॅक करावे? हे सर्चदेखील गुन्ह्यांच्या प्रकारात येते. या गुन्ह्यात IT Act 66C/66D अंतर्गत कारवाई होऊ शकते.

या सर्व गोष्टीमुळे इंटरनेटचा वापर जबाबदारीने करावा. कोणताही अवैध, हिंसक, गैरकायदेशीर किंवा प्रायव्हसी भंग करणारा विषय सर्च करू नका. एक चुकीचा सर्च तुमचे डिजिटल आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. गूगल हे सुविधा देण्यासाठी आहे, पण चुकीचा वापर तुम्हाला थेट कायद्याच्या कठोर चौकटीत नेऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these Google searches: Police may knock on your door!

Web Summary : Certain Google searches, like bomb-making, illegal drugs, child pornography, or hacking, can lead to police investigation and arrest under strict laws. Using the internet responsibly is crucial to avoid legal trouble.
टॅग्स :googleगुगलCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान