शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून Google ने Play store वरून हटवले 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे Apps; वेळीच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 13:35 IST

Google Play store Apps : गुगलने प्ले स्टोरवरून 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे अ‍ॅप्स हटवले आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. प्ले स्टोरवरून विविध अ‍ॅप्स हे डाऊनलोड केले जातात. मात्र आता गुगलने काही अ‍ॅप्सने दणका दिला आहे. गुगलने प्ले स्टोरवरून 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे अ‍ॅप्स हटवले आहेत. गुगल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्ले स्टोरवरून असे अनेक अ‍ॅप्स हटवले आहे. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करत होते. हे अ‍ॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाईन लोन सर्व्हिस देत असल्याची माहिती मिळत आहे. याआधीही गुगलने धोकादायक असणारे अ‍ॅप्स युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटवले आहे. 

गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली आहे. सरकार आणि युजर्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर गुगलने ही कारवाई केली आहे. गुगलने जवळपास 100 हून जास्त पर्सनल लोन अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्स शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. अनेक कंपन्या लोनसाठी युजर्सला त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अ‍ॅक्सेस करीत होती. काहींनी तर वसूली एजन्टकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. अशाच वेळी गुगलने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. 

फिनटेक एक्सपर्ट श्रीकांत एल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलने गेल्या दहा दिवसांत कमीत कमी 118 डिजिटल लोन अ‍ॅप्सला हटवले आहे. गुगलने पर्सनल लोन देणाऱ्या असंख्या कंपन्यांना  ते कशा पद्धतीने लोकल कायदा आणि रेग्युलेशनला फॉलो करत आहेत याबाबत विचारणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगल प्ले स्टोअरवर वेळोवेळी अनेक अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. युजर्सच्या सुविधेसाठी हे पाऊल उचललं आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने आणखी तीन अ‍ॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अ‍ॅप्सवर करण्यात आला आहे. Princess Salon, Number Coloring आणि Cats & Cosplay ही तीन अ‍ॅप्स गुगलने हटवली आहेत. 

अलर्ट! Google ने प्ले स्टोअरवरुन हटवले लहान मुलांचा डेटा चोरणारे "हे" Apps

डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंन्सिलकडून याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ही तिन्ही अ‍ॅप्स विशेषत: मुलांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र IDCA ने हे तीन अ‍ॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. यामध्ये लहान मुलांच्या माहितीचा समावेश होता. व हा डेटा या अ‍ॅप कंपन्यांकडून थर्ड पार्टीला दिला जात होता. कंपन्यांकडून सातत्याने होत असल्याचा हा प्रकार आयडीएसीच्या रिसर्च टीमच्या लक्षात आलं. त्यामुळे या टीमने या तीन अ‍ॅप्सच्या कृतीबाबत गुगलला माहिती दिली. गुगलने आम्ही रिपोर्टमध्ये सांगितलेले अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या नियमांचं उल्लंघन करणारा अ‍ॅप आढळतो तेव्हा आम्ही त्यावर कारवाई करतो. या अ‍ॅप्सकडून कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही अ‍ॅप्स लहान मुलांकडून वापरली जातात असं म्हटलं आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल