शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 21:18 IST

फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही. पण काही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत.

नवी दिल्ली-

फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही. पण काही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवा स्मार्टफोन खरेदी करू शकता. Flipkart वरुन Google Pixel 7 फोन अशाच एका जबरदस्त ऑफरसह तुम्ही विकत घेऊ शकणार आहात. 

Google Pixel 7 फोनवर तुम्ही फ्लॅट डिस्काऊंट आणि इतर ऑफर मिळवू शकता. फोन एक्स्चेंज ऑफर आणि बँक डिस्काऊंट देखील मिळत आहे. गुगलचा फ्लॅगशिप फोन यंदाच्या वर्षात लॉन्च झाला आहे. कंपनीनं बऱ्याच कालावधीनंतर भारतात आपला फ्लॅगशीप फोन लॉन्च केला आहे. 

किती रुपयांना खरेदी करु शकता?Google Pixel 7 फोनवर तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकणार आहात. या फोनवर तुम्ही HDFC बँक कार्डवर तुम्ही ५ हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळवू शकता. ही ऑफर तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्हीवर मिळेल. याशिवाय तु्म्ही २३ हजार रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू देखील प्राप्त करू शकता. आता एक्सचेंज प्राइज प्रत्येक डिव्हाइसच्या सद्यस्थितीवर अवलंबून असते. स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB स्टोअर ऑप्शन देण्यात आला आहे. 

Google Pixel 7 फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ५ हजार रुपयांच्या डिस्काऊंटनंतर याची किंमत ५४,९९९ रुपये इतकी होते. त्यावर तुम्ही २३ हजार रुपयांचा एक्सचेंज व्हॅल्यू देखील मिळवू शकता. 

Google Pixel 7 चे स्पेसिफिकेशनस्मार्टफोन 6.32 इंचाचा डिस्प्लेसह आहे. जो 2400x1080 पिक्सल रेज्युलेशनसह आहे. स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 1400Nits चा ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट Tensor G2 चिपसेटवर काम करतो. यात 8GB RAM आणि 128GB चा स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. 

फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. तर दुसरा कॅमेरा 12MP चा आहे. याशिवाय फ्रंट कॅमेरा 10.8MP चा देण्यात आला आहे. हँडसेटला 4270mAh ची बॅटरी आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड १३ सह उपलब्ध आहे.

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोन