शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Google Pixel 6a: Google च्या स्वस्त स्मार्टफोनची डिजाईन आली समोर; असे आहेत Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: November 22, 2021 12:12 IST

Google Pixel 6a Launch: 91mobiles आणि OnLeaks यांनी मिळून गुगलच्या आगामी Google Pixel 6a स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्समधून कंपनीच्या स्वस्त स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.

Google ने यावर्षी ऑक्टोबरमध्ये आपली ‘Pixel 6’ सीरिज जागतिक बाजारात सादर केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने फ्लॅगशिप Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro असे दोन फोन सादर केले होते. या फोन्समध्ये कंपनीच्या टेन्सर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, ही यांची खासियत होती. या डिवाइसेसना भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वांनाच सीरिजमध्ये स्वस्त फोन येईल का? हा प्रश्न पडला होता. फ्लॅगशिपनंतर आता कंपनी मिड रेंजमध्ये Google Pixel 6a सादर करणार आहे, अशी बातमी आली आहे.  

91mobiles आणि OnLeaks यांनी मिळून गुगलच्या आगामी Pixel 6a स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्समधून कंपनीच्या स्वस्त स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील रिपोर्टमधून मिळाली आहे. या फोनमध्ये कंपनी टेन्सरच्या ऐवजी स्नॅपड्रॅगन चिपसेटचा वापर करणार आहे.  

Google Pixel 6a  

समोर आलेल्या रेंडर्सनुसार Google Pixel 6a स्मार्टफोची डिजाइन Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखीच आहे. या फोनमध्ये पंच होल असलेला फ्लॅट OLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा आकार 6.2-इंच असेल. फ्लॅगशिप फोनप्रमाणे यात देखील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. या पिक्सल फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन तर डावीकडे सिम कार्ड स्लॉट मिळेल. Pixel 6a च्या तळाला USB type-C पोर्ट, एक स्पिकर ग्रील आणि माइक देण्यात येईल.  

Google Pixel 6a चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

गुगल आपल्या मिड रेंज फोनमध्ये Tensor ला डच्चू देऊ शकते. त्याजागी Tensor lite किंवा Snapdragon 778G मिळू शकतो. त्याचबरोबर 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. यातील कॅमेरा मात्र फ्लॅगशिप Pixel 6 प्रमाणे 50MP Samsung ISOCELL GN1 सेन्सर मिळेल. हा स्मार्टफोन Android 12 वर चालेल. याआधी हा फोन भारतात येईल कि नाही हे मात्र सध्यातरी सांगता येत नाही.  

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान