शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'गूगल पे'कडे युजर्सचा डेटाबेस नाही, गुगलची दिल्ली हायकोर्टाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:35 IST

जनहित याचिकेतील आरोपांबाबत गुगलने मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायाधीश प्रतीक जालान यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली बाजू मांडली आहे.

गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली  आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुगलनं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, आधार तपशील (डेटाबेस)आमच्याकडे नाही आणि मोबाइल अ‍ॅप 'गुगल पे' ऑपरेट करण्यासाठी आपल्याला अशा माहितीची आवश्यकता नसल्याचंही गुगल इंडियानं स्पष्ट  केलं आहे. जनहित याचिकेतील आरोपांबाबत गुगलने मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायाधीश प्रतीक जालान यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली बाजू मांडली आहे. जनहित याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, भारतीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाला (यूआयडीएआय) माहिती न देता गूगल पेला 'भीम' आधार प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला. गुगलने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 'प्रतिवादी -2 (गूगल पे) भीम आधारापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे, जे स्वतंत्र आहे. गुगल पेला कोणत्याही स्वरुपात वापरकर्त्याच्या आधार तपशिलाची आवश्यकता नसते किंवा त्यास आधार डेटाबेस लागत नाही.गुगलच्या प्रतिज्ञापत्रानुसार, अर्थशास्त्रज्ञ अभिजीत मिश्रा यांनी आपल्या जनहित याचिकेला उत्तर देताना आरोप केला होता की, गुगल पे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) परवानगी न घेता आर्थिक व्यवहार करतेय. मिश्रा यांनी आरबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हवाला देत याचिका दाखल केली होती. आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 'गुगल पे' थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हाईडर (टीपीएपी) आहे आणि कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही. त्यानुसार गूगल पेचे कामकाज पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अधिनियम 2007च्या नियमांचे उल्लंघन करत नाही.

टॅग्स :google payगुगल पे