नवी दिल्लीः डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अॅप वापरलं जातं. पण या गुगल पे अॅपमध्येही एक बग आलेला आहे. त्यामुळे बँक खातं आपोआप डिलीट होत आहे. गुगल पेच्या या बगमुळे पैसे पाठवणं आणि मिळवण्यात अडचणी येत आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून याची तक्रार केली आहे. ट्विटरच्या तक्रारीनुसार, अनेक लोकांना गुगल पे अॅपमध्ये बँक खातं दिसत नाही आहे. त्यामुळे गुगल पे अॅप पुन्हा एकदा बँक खातं लिंक करण्यास सांगत आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी तक्रार केल्या आहेत, त्यातील जास्त करून लोकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत.
Google Payमध्ये आला नवा बग, आपोआप डिलीट होतायत बँक खाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:59 IST