शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Google मध्ये मोठी कर्मचारी कपात, 12000 लोकांच्या रोजी-रोटीवर संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 20:57 IST

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल (Google) चालवणारी मूळ कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc.) ने  नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक मोठी घोषणा केली आहे. गुगलमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 12,000 लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. गुगलने खर्च कमी करण्यासाठी आपल्या विविध विभागांमध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हार्डवेअर, व्हॉईस असिस्टंट आणि इंजिनिअरिंग टीममध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल कंपनीला आपल्या सर्वोच्च प्राधान्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. याशिवाय, कंपनी 'भविष्यात महत्त्वाच्या संधींमध्ये योग्य गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे.'

याचबरोबर, आमच्या काही टीम्समध्ये स्ट्रक्चरल बदल करत आहेत, ज्यात जगभरातील काही पदे काढून टाकण्याचा समावेश असू शकतो, असे गुगलने म्हटले आहे. दरम्यान, गुगलने याआधी सांगितले होते की, ते फक्त काही शंभर पदे काढून टाकत आहेत, ज्याचा परिणाम अॅडव्हॉन्स हार्डवेअर टीमवर होईल. गुगल आणि तिची मूळ कंपनी अल्फाबेटने खर्च कमी करण्याचे मार्ग ठरवल्यानंतर ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी गुगल कंपनीने 6 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच जवळपास 12,000 लोकांना कामावरून काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, या आठवड्याच्या सुरुवातीला अॅमेझॉन कंपनीने आपल्या प्राइम व्हिडिओ आणि स्टुडिओ युनिट्समधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच, कंपनी आपल्या लाइव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ट्विचवर काम करणाऱ्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कंपनीची योजना आहे. 

दरम्यान, गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. कंपनीचे मोबाईल फोन सॉफ्टवेअर अँड्रॉइड जगभरात लोकप्रिय आहे. याशिवाय कंपनीच्या जीमेल, यूट्यूब आणि मॅप्स सर्व्हिसच्या युजर्सची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय