शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आता गुगल ट्रान्सलेशनमध्ये भोजपुरी, संस्कृतसह आणखी ८ भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:12 IST

गुगल ट्रान्सलेटमध्ये नवीन अपडेटनंतर संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. गुगलमध्ये नवीन अपडेटनंतर तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल.

भाषांतर करण्यासंदर्भात गुगलने एक मोठे अपडेट जारी केले आहे. तुम्ही गुगलवर आता संस्कृत आणि भोजपुरीमध्ये देखील भाषांतर करू शकता. गुगल ट्रान्सलेटमध्ये नवीन अपडेटनंतर संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. गुगलमध्ये नवीन अपडेटनंतर तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल. गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध असलेल्या एकूण भारतीय भाषांची संख्या आता १९ वर गेली आहे. तर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये आता भाषांतर करता येणार आहे. गुगलने ही घोषणा बुधवारी उशिरा सुरू झालेल्या वार्षिक परिषदेत केली आहे. आपल्या ऑनलाइन भाषांतर प्लॅटफॉर्मवर सतत अनेक प्रादेशिक भाषा जोडत आहे.

ईशान्य भारतातील सुमारे २५ दशलक्ष लोक आसामी भाषा वापरतात. सुमारे ५० दशलक्ष लोक भोजपुरी वापरतात. मध्य भारतातील सुमारे २० दशलक्ष लोक कोंकणी वापरतात. एका खास मुलाखतीत इकोनॉमिक्स टाईम्सला गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल यांनी सांगितले की, गुगल भाषांतरात संस्कृत ही प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत. आम्ही प्रथमच ईशान्य भारतातील भाषांना जोडत आहोत.

भारतातील भाषांशी संबंधित भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची असून या अनुसूचीमध्ये २२ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु गुगलच्या नवीनतम अपडेटमध्ये भारतातील सर्व २२ अनुसूचित भाषांचा समावेश नाही. याबाबत कॅसवेल यांनी सांगितले की, अनुसूचित भाषांमधील ही तफावत कमी करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल