शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुगल होम मॅक्स : प्रिमीयम स्मार्ट स्पीकर

By शेखर पाटील | Updated: October 5, 2017 19:33 IST

गुगल कंपनीने आपल्या मेगा लाँच इव्हेंटमध्ये गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमियम आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे.

गुगल पिक्सल २ आणि पिक्सल एक्सएल २ या दोन स्मार्टफोनसोबत अन्य काही उपकरणेदेखील लाँच करणार असल्याचे मानले जात होते. या अनुषंगाने गुगल होम या स्मार्ट स्पीकरची मिनी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. खरं तर गुगल होम मिनी हे मॉडेल आधीच अनेक लीक्समधून समोर आले होते. मात्र या कार्यक्रमात गुगलने गुगल होम मॅक्स या दुसरा स्मार्ट स्पीकर सादर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. हे मॉडेल म्हणजे गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमीयम आवृत्ती आहे.

गुगल होम मॅक्स या स्मार्ट स्पीकरमध्ये ४.५ इंच आकारमानाचे दोन वुफर्स देण्यात आले आहेत. यात अत्यंत संवेदनशील असे सहा मायक्रोफोनही असतील. याच्या मदतीने अगदी गदारोळ असतांनाही व्हाईस कमांडचा उपयोग करता येत असल्याचा गुगलने दावा केला आहे. यात स्मार्ट क्लाऊड नावाची मशीन लर्नींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने घरातील कोणत्याही कोपर्‍यात हा स्मार्ट स्पीकर असला तरी तो आपल्या भौगोलिक ठिकाणाशी स्वयंचलीत पध्दतीने अ‍ॅडजस्ट होतो. तसेच घरातील वातावरणाचे अचूक आकलन करून याचा आवाज आपोआप कमी-जास्त होतो. अर्थात घरात कुणी मोठ्याने बोलत असल्यास या स्पीकरचा आवाज स्वयंचलीत पध्दतीने मोठा होतो. तर घरात शांतता असल्यास आवाज कमी होतो. याला आडवा आणि उभा या दोन्ही पध्दतीत वापरणे शक्य आहे.

गुगल होम मॅक्स या मॉडेलला गुगल क्रोमकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.  यातही गुगल असिस्टंटवर आधारित व्हाईस कमांडचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे कुणीही ओके गुगल म्हणून याला विविध आज्ञावली देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून याच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय यात ऑडिओ जॅकदेखील देण्यात आले आहे. यामुळे याला अन्य उपकरणे जोडणे शक्य आहे. गुगल होम मॅक्सचे मूल्य ३९९ डॉलर्स असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल डिसेंबर महिन्यात मिळणार आहे. या स्मार्ट स्पीकर खरेदी करणार्‍याला गुगलने एक वर्षापर्यंत युट्युब म्युझिकची प्रिमीयम मेंबरशीप मोफत देण्याची घोषणा केली आहे.

पहा: गुगल होम मॅक्सची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइल