शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

अलर्ट! Google ने प्ले स्टोअरवरुन हटवले लहान मुलांचा डेटा चोरणारे "हे" Apps, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 16:39 IST

Google Apps : गुगलने आणखी तीन अ‍ॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोअरवर वेळोवेळी अनेक अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. युजर्सच्या सुविधेसाठी हे पाऊल उचललं आहे. यावेळीही गुगलने आणखी तीन अ‍ॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अ‍ॅप्सवर करण्यात आला आहे. Princess Salon, Number Coloring आणि Cats & Cosplay ही तीन अ‍ॅप्स गुगलने हटवली आहेत. 

डिजिटल अकाउंटेबिलिटी काउंन्सिलकडून याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ही तिन्ही अ‍ॅप्स विशेषत: मुलांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र IDCA ने हे तीन अ‍ॅप्स युजर्सचा डेटा कलेक्ट करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. यामध्ये लहान मुलांच्या माहितीचा समावेश होता. व हा डेटा या अ‍ॅप कंपन्यांकडून थर्ड पार्टीला दिला जात होता. कंपन्यांकडून सातत्याने होत असल्याचा हा प्रकार आयडीएसीच्या रिसर्च टीमच्या लक्षात आलं. त्यामुळे या टीमने या तीन अ‍ॅप्सच्या कृतीबाबत गुगलला माहिती दिली.

गुगलने आम्ही रिपोर्टमध्ये सांगितलेले अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या नियमांचं उल्लंघन करणारा अ‍ॅप आढळतो तेव्हा आम्ही त्यावर कारवाई करतो. या अ‍ॅप्सकडून कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही अ‍ॅप्स लहान मुलांकडून वापरली जातात असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगलने कडक पाऊल उचललं असून प्ले स्टोरवरून तब्बल 240 हून अधिक मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. हे सर्व अ‍ॅप्स अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर चालणारे होते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर लगेचच फोनमधून डिलीट करा. 

स्मार्टफोन अलर्ट! Google ने 240 हून अधिक अँड्रॉईड अ‍ॅप्स केले ब्लॉक, वेळीच व्हा सावध

240 अ‍ॅप युजर्संना वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते. तसेच गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत होते. म्हणूनच गुगलने ही कारवाई केली आहे. गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अ‍ॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. यात सर्वात जास्त अ‍ॅप्स RAINBOWMIX ग्रुपचे आहे. ज्यात जुन्या गेम्ससह या ग्रुपच्या अ‍ॅप्सला रोज 1.4 कोटी लोकांपर्यंत पोहोचले होते. पॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचत होत्या. अँड्रॉईड स्मार्टफोनमधून RAINBOWMIX ग्रुपचे अ‍ॅप्स लवकरात लवकर डिलीट करा गुगलने युजर्सला आव्हान केलं आहे. हे ग्रुप खूप दिवसांपासून गुगलच्या नियमांचे उल्लंघन करत आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान