शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

गुगल Birthday Surprise Spinner; नेटकऱ्यांसाठी काही खास खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:53 IST

आपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे

ठळक मुद्देआपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे.गुगलने गेल्या १९ वर्षांत लाँच केलेले १९ सरप्राइज आहेत.

मुंबई- इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटकऱ्याचं सर्वांत लाडकेृं शोध साधन आहे. आपल्या 19व्या वाढदिवसानिमित्त गुगल Birthday Surprise Spinner घेऊन आलं आहे. याद्वारे नेटकरी आपलं मनोरंजन करू शकतो. या खास गुगल Birthday Surprise Spinner वर नेटकऱ्यांसाठी विविध खेळ तयार करण्यात आले आहेत. त्या खेळाचा नेटकरी आनंद घेऊ शकतात. गुगल पेज सुरू केल्यावर येणाऱ्या विंडोवर क्लिक केलं की नेटकऱ्यांना स्पिनर दिसेल त्या स्पिनरवर क्लिक केल्यावर विविध गेम असतील त्यापैकी एका खेळावर स्पिनर येऊन थांबला की तो खेळ आपण खेळू शकतो.  गुगलने गेल्या १९ वर्षांत लाँच केलेले १९ सरप्राइज आहेत. यात गुगलच्या प्रसिद्ध झालेल्या 'स्नेक' गेमचाही समावेश आहे.

गुगल Birthday Surprise Spinner मधील काही गेम

- स्नेक गेमगुगलच्या सर्च फनबॉक्समधील स्नेम गेम हा लेटेस्ट वैशिष्ट्यं असणारा खेळ आहे. या खेळामध्ये एक साप आहे ज्याची उंची बोर्डवर असणारा प्रत्येक सफरचंद खाल्ला की वाढत जाते. बोर्डवर एका मागे मागे असे सफरचंद येतात. सापाने एक सफरचंद खाल्ला की लगेचच दुसऱ्या ठिकाणी सफरचंद येतं. ते सफरचंद पुन्हा सापाला पडकायचं आहे. पण या बोर्डवर असलेल्या चार बाजूंपैकी एका बाजूला सापाची धडक बसली तर गेम पुन्हा सुरू होतो. गेममधील या सापाची हालचाल युजरला कि-बोर्डवरील अॅरो किवरून कंट्रोल करायची आहे. मोबाईल डिव्हाइसमध्ये सुरू झालेले स्नेक गेम हा पहिला खेळ असल्याचं पॉकेजगेमर.बिज ने म्हंटलं आहे. 

- क्रिकेट गेमई क्रिकेट गेम गुगलने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताची कामगिरी साजरी करण्यासाठी या वर्षीच्या सुरूवातीला लॉन्च केला आहे. गुगलने तयार केलेल्या सर्वात लोकप्रिय डुडल गेमपैकी हा गेम एक हे सिद्ध झाले आहे. हा गेम सुरू केल्यावर सुरूवातीला क्रिकेट.. क्रिकेट असा आवाज येतो.  डुडलवरील हा गेम अत्यंत उत्कृष्टपणे तयार करण्यात आला आहे. यामध्ये समोरून येणारा बॉल मारण्यासाठी वेळेनुसार बॅटवर क्लिक करायचं आहे. योग्य वेळी बॅटवर क्लिक केल्यावर बॅट फिरून बॉलवर मारली जाते. या खेळात तुम्ही सिक्सपण लगावू शकता. तसंच पळून रन्सही बनविता येतील. गेमवर एक स्कोअर बोर्ड आहे. त्यावर तुमचा स्कोअर दिसेल. जर तुमच्याकडून बॉल चुकला तर तुम्ही मॅचमधून आऊट व्हाल.

-  हिपहॉप गेमआजच्या सरप्राइज स्पिनरमध्ये गुगलने नेटकऱ्यांसाठी खास गेम पुन्हा आणला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला गुगलने हिपहॉप म्युझिकचा पंचेचाळीसाव्वा वाढदिवस साजरा केला होता. या खेळात गुगलने नेटकऱ्यांना डिजे बनण्याची संधी दिली होती. म्हणजे डुडलने दिलेल्या म्युझिक बोर्डवर तुम्ही तुम्हाला आवडणारं हिपहॉप म्युझिक वाजवू शकता. हा गेम खेळण्यासाठी बोर्डवर असणाऱ्या प्ले बटणवर क्लिक करायचं आहे. प्ले बटण क्लिक केल्यावर डिजीटर 'रेकॉर्ड क्टे' सुरू होईल, त्यामध्ये क्लासिक म्युझिकची एक लिस्ट असेल. त्या गाण्यांना तुम्ही तुमच्या आवडत्या हिपहॉप म्युझिकमध्ये वाजवू शकता. तुम्ही निवडलेलं गाणं स्लायडर कंट्रोलच्या मदतीने दुसऱ्या म्युझिकमध्ये कस्टमाइज करू शकता.

- ब्रिथिंग एक्सरसाइजगुगलने नेटकऱ्यांच्या आरोग्यासाठीही काही गोष्टी सुरू केल्या. तुम्हाला तणाव जाणवत असेल तर गुगलवर ब्रिथिंग एक्सरसाइज टाइप केलं की गुगलकडून तणाव दूर करण्यासाठी विविध सोपे पर्याय देण्यात आले आहे. ज्याचा फायदा तुम्हाला तणाव दूर करायला होईल.

टिक टॅक टो'टिक टॅक टो' या गेमचं ओळखीचं नाव म्हणजे 'फुल्ली- गोळा'. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा गेम खेळतात. पण पेपरवर हा गेम खेळताना तुमच्या सोबत आणखी एक व्यक्ती त्यासाठी लागतं. पण गुगलवर हा गेम तुम्हाला एकट्याला खेळता येईल. हा गेम तुमच्या बरोबर गुगल खेळणार आहे.