शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

खूशखबर... १५ मेनंतरही व्हॉट्सॲप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:53 IST

व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.

आपल्या तमाम यूझर्सना व्हॉट्सॲपने खूशखबर दिली आहे. आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सॲपने १५ मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सॲपने या मुदतीपासून माघार घेतली आहे. यूझर्सने नव्या पॉलिसीचा स्वीकार नाही केला तरी त्यांचे अकाउंट सुरूच राहणार आहे... (Good news ... WhatsApp will continue after 15 minutes, withdraws from privacy policy deadline)

पॉलिसीचा स्वीकार न केल्यास- प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न केल्यास कालांतराने यूझरचे व्हॉट्सॲप अकाउंट आपोआप निष्क्रिय होणार आहे.- प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतर ही मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली. व्हॉट्सॲपने ही अंतिम मुदत मागे घेतली आहे.

काय आहे प्रायव्हसी पॉलिसीव्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे.यूझर आयडी, डिव्हाइस आयडी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, पेमेंट इन्फो, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, यूझर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्सॲपकडे शेअर होणार आहे. त्यामुळे यूझर्सच्या प्रायव्हसीवर गदा येणार आहे.या सर्व कारणांमुळे व्हॉट्सॲपच्या या प्रायव्हसी पॉलिसीला प्रखर विरोध होत आहे.

मग काय होणार! व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार घेतली असली तरी यूझरला पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठीचा मेसेज वारंवार येत राहील.- पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी यूझरला आग्रह धरला जाईल.- जे यूझर पॉलिसीचा स्वीकार करणार नाही, त्यांचे अकाउंट डिलीट होईल, असे आधी सांगितले गेले होते; परंतु तसे आता होणार नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड