शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 10:16 IST

गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही उपयोग होणार नाही... (Smartphones)

नवी दिल्ली - जर आपण अँड्रॉइड युजर्स असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी नाही. कारण, टेक गूगल आता 2.3.7 किंवा जे फोन यापेक्षा लोवर व्हर्जनवर काम करतात, त्यांना साइन-इन सपोर्ट करणार नाही. यासंदर्भात गुगलने युझर्सना मेल पाठवून माहिती दिली आहे. या मेलवरून समजते, की येणाऱ्या 27 सप्टेंबरपासून गुगल या स्मार्टफोन्सना सपोर्ट करणार नाही. (Gmail and youtube will not support these smartphones know the reason)

करावे लागेल अपडेट -गुगलने म्हटले आहे की, सप्टेंबरनंतर, युझर्सना गुगल अ‍ॅप्स वापरायचे असतील, तर त्यांना किमान अँड्रॉइड 3.0 हनीकॉम्बमध्ये अपडेट करावे लागेल. यामुळे फोनमध्ये अ‍ॅप लेव्हल साईन-इनवर परिणाम होईल. मात्र, युझर्सना आपल्या फोनच्या ब्राउझरच्या माध्यमाने Gmail, Google Search, Google Drive, Youtube मध्ये साईन-इन करावे लागेल.

फार कमी युझर्स होतील प्रभावित -अहवालानुसार, गुगल आपल्या युझर्सच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलत आहे. तसेच, अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की याचा फटका फार कमी युझर्सना बसेल. कारण फार कमी युझर्स असे जुने अँड्रॉइड व्हर्जन वापरतात. गूगलने म्हटल्याप्रमाणे, येत्या 27 सप्टेंबरपासून, युझर्स अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 अथवा त्याहून कमी व्हर्जन असलेला फोन वापरत असतील, तर Google अ‍ॅपमध्ये साईन-इन केल्यानंतर त्यांना स्क्रीनवर ‘username अथवा password error’ असा मेसेज दिसेल. Reset करूनही चालणार नाही -गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही त्याच्या फोनच्या स्क्रीनवर Error मेसेजच लिहिलेला येईल. एवढेच नाही, तर युझरने नवा पासवर्ड तयार केला आणि पुन्हा साईन इन केले तरी ते काम करणार नाही.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनgoogleगुगलYouTubeयु ट्यूबAndroidअँड्रॉईड