शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

3 प्रकारच्या गेमिंग अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालणार, केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 13:47 IST

गेमिंग अ‍ॅप्सबाबत सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे.

गाझियाबादचे धर्मांतराचे प्रकरण सध्या गाजत आहे. Fornite आणि Valorant सारख्या काही लोकप्रिय गेमद्वारे युजर्सना आपला धर्म बदलण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी शाहनवाज मकसूद खान याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गेमिंग अ‍ॅप्समुळे पालक आणि इतर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच, गेमिंग अ‍ॅप्सबाबत सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराच्या घटनेवर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही पहिल्यांदा ऑनलाइन गेमिंगच्या फ्रेमवर्क सल्लामसलतीनंतर अधिसूचित केले आहे, ज्यामध्ये भारतात तीन प्रकारच्या गेम्सना परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, राजीव चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार, या तीनपैकी कोणत्याही एका प्रकारात कोणताही गेम आला तर भारतात त्यावर बंदी घातली जाईल. 

अशा प्रकारच्या गेम्सना परवानगी दिली जाणार नाही 1. बेटिंग गेम2. युजर्सला हानी पोहोचवणारे गेम3. व्यसनाधीन (अ‍ॅडिक्टिव्ह) गेम

काय आहे गाझियाबाद ऑनलाइन गेमिंग प्रकरण?शाहनवाज उर्फ ​​बढ्दो हा गेमिंग अ‍ॅप्सवर चॅटिंगद्वारे तरुणांना धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करत होता. गेम जिंकण्याचे टेक्निक सांगण्याच्या नावाखाली तो प्लेअर्सशी इस्लामविषयी बोलत होता. तसेच, गेम जिंकण्यासाठी कुराणचा श्लोक वाचायला सांगायचा. आरोपीच्या जाळ्यात अडकून महाराष्ट्रातील मुंब्रा येथील 400 हून अधिक लोकांनी धर्म बदलला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या शाहनवाजला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनtechnologyतंत्रज्ञान