शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

अनोळखी कॉल्सच्या त्रासातून आता सुटका, व्हॉट्सॲपचे ‘अननोन कॉलर’ फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 07:15 IST

या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जाते.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्समुळे अनेक यूजर्सची फसवणूक होत असल्याचे पुढे आले होते. विशेषतः व्हिडीओ कॉलद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने नुकतेच ‘सायलेंट अननोन कॉलर’ फीचर लॉन्च केले. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जाते.

व्हॉट्सॲपची पालक कंपनी असलेल्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबतची माहिती दिली. हे फीचर भारतासह जगभरात लॉन्च झाले आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवर हे फीचर उपलब्ध झाले नसेल, तर व्हॉट्सॲप अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. व्हॉट्सॲपने नुकतेच दोन फोनमध्ये एकाच नंबरचे व्हॉट्सॲप वापरता येईल अशी सुविधा ग्राहकांना नुकतीच दिली आहे. 

कसे वापराल फीचर? सर्वप्रथम व्हॉट्सॲप सुरू करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.त्यात कॉल्स ऑप्शनमध्ये जा. तिथे सायलेंट अननोन कॉलरला इनेबल करा.

स्पॅम कॉल्स वाढलेव्हॉट्सॲपवर अनेकांना  २५४,  ८४,  ६३,  २१,  ६२ आदी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण बरेच वाढले होते. प्रामुख्याने आफ्रिकी तसेच दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून हे कॉल येत होते. या फीचरमुळे यूजर्सना स्पॅम कॉल म्यूट करता येईल.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान