शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:36 IST

BSNL Fancy Numbers : फॅन्सी नंबर देण्यासाठी बीएसएनएलकडून एक सर्व्हिस दिली जाते.

BSNL Fancy Numbers : गेल्या वर्षी जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या नव्हत्या. त्यामुळे खाजगी कंपन्यांकडून बीएसएनएलमध्ये पोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली. 

अजूनही बरेच लोक बीएसएनएलमध्ये आपले नंबर पोर्ट करत आहेत. जर तुम्हीही बीएसएनएलमध्ये सामील होण्याचा विचार करत असाल आणि स्वतःसाठी फॅन्सी नंबर किंवा व्हीआयपी फोन नंबर हवा असेल, तर तो कसा खरेदी करावा, यासंदर्भात जाणून घ्या...

फॅन्सी नंबर देण्यासाठी बीएसएनएलकडून एक सर्व्हिस दिली जाते. Choose Your Mobile Number(CYMN) या नावाने ही सर्व्हिस दिली जाते. पूर्वी ही सुविधा लिमिटेड सर्कलमध्ये मिळत होती आणि आता ही सुविधा सर्वांना उपलब्ध करण्यात आली आहे. बीएसएनएलद्वारे ऑनलाइन फॅन्सी नंबर मिळविण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करता येईल.

अशा प्रकारे फॅन्सी नंबर मिळवू शकता- पहिल्यांदा तुम्हाला http://cymn.bsnl.co.in/ या लिंकवर जाऊन कंपनीची वेबसाइट उघडावी लागेल.- ही सर्व्हिस कुठे घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला झोन आणि राज्य निवडावे करावे लागेल.- यानंतर, तुम्हाला एक टेबल दिसेल जिथे सर्व नंबर उपलब्ध असतील. येथे तुम्हाला दोन कॉलम मिळतील. यामध्ये पहिला पर्याय तुम्हाला चॉइस नंबर निवडण्याची परवानगी देईल आणि दुसरा पर्याय तुम्हाला फॅन्सी नंबर निवडण्याची परवानगी देईल.- येथे तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर निवडावा लागेल. यासाठी तुम्हाला सीरिज, स्टार्ट नंबर, एंड नंबर आणि सम ऑफ ग नंबर्स (Sum of the numbers) असे पर्याय देखील मिळतील.- आता, तुम्हाला नंबर निवडायचा आहे आणि रिझर्व्ह नंबर पर्याय निवडावा लागेल.- त्यानंतर, मेसेजद्वारे पिन मिळविण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.- त्यानंतर, ग्राहकाला ऑपरेटर कस्टमर केअर किंवा सर्व्हिस ब्रांचशी संपर्क साधावा लागेल. - एकदा हे पूर्ण झाले की, युजर्सना फॅन्सी नंबरसाठी पैसे द्यावे लागतील आणि सर्व फॉर्मेलिटी पूर्ण करावी लागेल.

फॅन्सी नंबर निवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वे...युजर्सना फक्त एकच नंबर निवडण्याची परवानगी आहे. दुसरे म्हणजे, युजर्सना एकाच वेळी फॅन्सी नंबरसाठी पैसे द्यावे लागतात. ही योजना फक्त GSM नंबर ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांना मेसेजद्वारे सात अंकी पिन मिळेल, जो चार दिवसांसाठी व्हॅलिड असेल आणि किंमत सुद्धा फिक्स्ड आहे. दरम्यान, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ सारखे इतर ऑपरेटर देखील आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रक्रियांसह व्हीआयपी नंबर देतात.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान