शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने Ai समिटमध्ये दाखविला; चीनसह स्वदेशी नेटकऱ्यांनी शाळा घेताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:00 IST

Galgotias University Robodog Controversy: दिल्लीतील AI समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाने मांडलेला 'ओरियन' रोबोडॉग चिनी बनावटीचा असल्याचा आरोप. विद्यापीठाने दिलेले स्पष्टीकरण आणि व्हायरल वादाबद्दल सविस्तर वाचा.

नवी दिल्ली: दिल्लीत आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये एका रोबोटिक कुत्र्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीने प्रदर्शनात मांडलेला 'ओरियन' नावाचा रोबोडॉग हा प्रत्यक्षात चीनमधील 'युनिट्री' कंपनीचे उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

समिटमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधीने हा रोबोडॉग त्यांच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने विकसित केल्याचा दावा केला होता. प्रसारमाध्यमांकडून चांगली प्रसिद्धीही मिळविली होती, असा आरोप  युजर्सनी केला आहे. चमकोगिरी सुरु असताना हा रोबोडॉग प्रत्यक्षात चीनच्या 'Unitree Go2' या मॉडेलसारखा दिसत असून त्याची किंमत साधारण २ ते ३ लाख रुपये आहे, असे समोर आले आणि या विद्यापीठाची बनवेगिरी जगजाहीर झाली. "परदेशी तंत्रज्ञान स्वतःचे नाव देऊन मिरवणे चुकीचे आहे," अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. त्यात चायना पल्स या सोशल मीडिया हँडलने चीनच्या कंपनीचा रोबोट भारतीय विद्यापीठ स्वत:चा असल्याचे सांगत असल्याचे म्हटले आणि हा आंतरराष्ट्रीय मुद्दा केला. यावरून सोशल मीडियावर दिवसभर चांगलीच नाचक्की झाली. 

दिवसभराच्या नाचक्कीनंतर रात्री विद्यापीठाचा खुलासावाद वाढल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाने रात्री उशिरा म्हटले की, "आम्ही हा रोबोडॉग बनवल्याचा दावा कधीही केलेला नाही. हा रोबोट चीनच्या 'युनिट्री' कंपनीकडून खरेदी करण्यात आला असून तो आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि प्रयोगांसाठी एक साधन म्हणून वापरला जातोय. विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा हाच आमचा उद्देश आहे."

फॅक्ट-चेकमध्ये वेगळीच माहितीविद्यापीठाने स्पष्टीकरण दिले असले तरी, 'X' च्या कम्युनिटी नोट्समध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, प्रदर्शनादरम्यान या रोबोटला 'ओरियन' नाव देण्यात आले होते आणि तो स्वतः विकसित केल्याचे भासवले गेले होते. या विसंगतीमुळे इंटरनेटवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chinese Robot Displayed by Indian University Sparks Controversy at AI Summit

Web Summary : An Indian university showcased a Chinese robot dog at an AI summit, claiming it was their own. Social media backlash ensued, exposing the fabrication. The university later clarified it was purchased for educational purposes, but inconsistencies remain.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सchinaचीन