शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

चार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 16:56 IST

वावेचा सब-ब्रॅण्ड ऑनर इंडिया कपंनीने आपला आणखी एक 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 21 जानेवारीपासून ठराविक वेळेत फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात केला लाँच21 जानेवारीपासून फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला लाँच होणार

मुंबई : वावेचा सब-ब्रॅण्ड ऑनर इंडिया कपंनीने आपला आणखी एक 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 21 जानेवारीपासून ठराविक वेळेत फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, यामध्ये दोन मॉडेल असून 3 जीबी रॅम आणि 32 इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी असणार आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 14,999 रुपयांना आहे.  भारतात लाँच झालेल्या या दोन्ही स्मार्टफोनचा कलर व्हेरियंट मिडनाइट ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्लेशियर ग्रे असा आहे. याचबरोबर, 2160X1080 पिक्सेल रिझॉल्यूशन असलेला 5.65 इंचाचा डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर किरिन 659 प्रोसेसर असून अँड्राईड ओरिओ 8.0 या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा चालणार आहे.तसेच, दोन्ही स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. याशिवाय, या स्मार्टफोनची खाशियत म्हणजे यामध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहे. बॅक कॅमेरा 13 मेगा पिक्सल आणि 3 मेगापिक्सलचा आहे, तर फ्रंटला असणारे कॅमेरे सुद्धा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅश आहे. याचबरोबर, चार कॅमे-यांशिवाय या दोन्ही स्मार्टफोमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूट्युथ, वाय-फाय,  4G VoLTE, जीपीएस/ए-जीपीएस, मॉयक्रो-यूएसबी (ओटीजीसोबत) आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅकची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, 3000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने असा दावा केला आहे की, 3 जी नेटवर्कवर 20 तास टॉकटाइम आणि 24 चार स्टॅंडबाय टाइम बॅटरी पुरेल इतकी क्षमता आहे.  

Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला होणार लाँचचीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.  Oppo A83 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने चीनमध्ये लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन फेस अनलॉक फिचरसोबत मार्केटमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे समजते. मात्र, मीडियाने दिलेल्या माहितीनुसार , Oppo A83 स्मार्टफोनची किंमत 13,990 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आल्यास Xiaomi Mi A1, Honor 7X आणि Samsung Galaxy On Max या स्मार्टफोनशी टक्कक देईल असे बोलले जात आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान