शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक आणणार धमाकेदार फिचर; ‘या’ कामासाठी आता वेगळ्या अ‍ॅपची भासणार नाही गरज  

By सिद्धेश जाधव | Updated: August 24, 2021 15:15 IST

Facebook App Features: Facebook आपल्या मुख्य अ‍ॅपमध्ये व्हॉइस कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग फिचर पुन्हा जोडणार आहे.  

अमेरिकेतील फेसबुक युजर्स आता फेसबुक अ‍ॅपमधूनच व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल करत आहेत. फेसबुकने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरमुळे फेसबुक युजर्सना वारंवार मुख्य अ‍ॅपवरून मेसेंजर अ‍ॅपवर जावे लागणार नाही.  सध्या हे फिचर अमेरिकेत उपलब्ध आहे, परंतु लवकरच हे जभरातील युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते. 

याआधी मेसेंजर आणि फेसबुक एकाच अ‍ॅपमध्ये उपलब्ध होते. परंतु, 2014 फेसबुकने मेसेंजरचे फिचर नव्या अ‍ॅपमध्ये टाकून दोन अ‍ॅप सादर केले होते. नव्या अ‍ॅपमध्ये मेसेज, व्हिडीओ कॉल आणि व्हॉइस कॉल असे फंक्शन्स देण्यात आले होते. फेसबुकने मेसेंजरचे काही मर्यादित फीचर्स फेसबुक अ‍ॅपमध्ये जोडण्यास सुरुवात केली आहे. कालांतराने हे फीचर्स वाढवले देखील जाऊ शकतात, त्यामुळे मेसेंजर अ‍ॅपचा वापर कमी होईल.  

फेसबुकने सादर केलेले Horizon Workroom आहे तरी काय?  

फेसबुक Oculus च्या मदतीने हे नवीन प्लॅटफॉर्म डेवलप करत आहे आणि घरातून काम होणाऱ्या कमला स्टॅंडर्ड स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. संवाद साधण्याची ही नवीन पद्धत लवकरच ‘Metaverse’ नावाने भविष्यातील ऑफिस स्पेस बनू शकते. Horizon Workroom अ‍ॅपचा उपयोग करण्यासाठी युजर्सना आपल्या अवतार व्हर्जनमध्ये मीटिंग होस्ट करावी लागेल. यासाठी Oculus Quest 2 हेडसेटचा वापर करावा लागेल. फेसबुकने Oculusच्या माध्यमातून वर्चुअल रियलिटी सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे.  

हे नवीन अ‍ॅप मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. परंतु या अ‍ॅपचा वापर करण्यातही हार्डवेयर Oculus Quest 2 हेडसेट विकत घ्यावा लागेल, ज्याची किंमत $300 (जवळपास 22,000 रुपये) आहे. या नवीन प्लॅटफॉर्म VR मध्ये 16 आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 50 लोक एकसाथ सामील होऊ शकतात. फेसबुकचे कर्मचारी या नवीन अ‍ॅपचा वापर करतात, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या या उपक्रमामुळे घरातून काम करणाऱ्या लोकांना एक वर्चुअल ऑफिस मिळेल.   

टॅग्स :Facebookफेसबुक