शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

अवघ्या ३० रुपयांत 'ही' कंपनी देतेय ६ OTT सब्सक्रिप्शन; जाणून घ्या जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:17 IST

कंपनीचा बेस प्लॅन ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

नवी दिल्ली - आजकालच्या जगात केबलसोबत आता OTT फ्लॅटफॉर्मची जोरदार हवा आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून ब्रॉडबँड प्लॅन OTT सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. काही कंपन्यांनी रिचार्जच्या एकत्रित प्लॅनमधून तर काही अतिरिक्त शुल्क भरून OTT सब्सक्रिप्शन ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर Excitel कंपनीनं ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये अवघ्या ३० रुपयांत ग्राहकांना OTT सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

Excitel या OTT प्लॅटफॉर्मवर रिचार्ज प्लॅनसह सबस्क्रिप्शन एकत्रित देत नाही. कंपनी 300Mbps आणि 400Mbps च्या स्पीड प्लॅनसह OTT पॅक ऑफर करत आहे. कंपनीच्या मते ते ८,५०,००० ग्राहकांशी जोडलेले आहेत आणि वेगाने त्यांचा विस्तार होत आहे. या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया. 

Excitel OTT पॅक काय आहे?कंपनीचा बेस प्लॅन ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय ग्राहकांना ६० रुपये, १०० रुपये आणि २०० रुपयांमध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला या सर्व प्लॅनचा लाभ फक्त हाय-स्पीड इंटरनेट प्लॅनसह मिळेल.

३० रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT Balaji आणि Play box TV चे सबस्क्रिप्शन मिळत आहे. म्हणजेच, ३० रुपयांच्या मासिक खर्चात, तुम्हाला ६ प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळेल. ६० रुपयांच्या मासिक रिचार्जमध्ये तुम्हाला Zee5, Sony LIV आणि Play BOX TV चे सबस्क्रिप्शन मिळेल.

१०० आणि २०० रुपयांमध्ये काय मिळेल?१०० रुपयांच्या OTT प्लॅनमध्ये ग्राहकांना ZEE5, Sony LIV, EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT बालाजी आणि Play Box TV सब्सक्रिप्शन मिळेल. त्याच वेळी, २०० रुपयांच्या प्लॅनमध्ये, ग्राहकांना ZEE5, Sony LIV, Disney + Hotstar, EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT बालाजी आणि Play Box TV सबस्क्रिप्शन मिळेल.

सर्व प्लॅन्सच्या किमती जीएसटी शुल्काशिवाय आहेत. त्यांचा फायदा फक्त हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असलेल्या ग्राहकांनाच मिळेल. तुम्ही १००Mbps किंवा २००Mbps चा प्लान वापरत असाल तर तुम्हाला या OTT पॅकचा लाभ मिळणार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"