शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:18 IST

Amazon मध्ये नोकरी करण्यासाठी Google ची नोकरी सोडली, नंतर Amazon नेही जॉब ऑफर परत घेतली.

गेल्या काही दिवसांपासून आयटी कंपन्यांच्या लेऑफच्या म्हणजेच, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या बातम्या समोर येत आहेत. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नाराळ दिले. यातच Google सारख्या कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाची फार वाईट अवस्था झाली. Amazone या कंपनीने त्याची इतकी मोठी फसवणूक केली, त्याची अवस्था 'ना इधर का, ना उधर का' अशी झाली आहे.

या इंजिनिअरने स्वत: LinkedIn वर एक पोस्ट शेअर करून आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल- 'असं कुणासोबत होऊ नये'. त्याने आता गूगल आणि अॅमेझॉन, दोन्ही नोकऱ्या गमावल्या आहेत आणि आता त्याच्याकडे फक्त 60 दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान त्याला दुसरी नोकरी मिळाली नाही, तर मायदेशात परतावे लागेल.

नेमकं काय झालं?गूगलमध्ये काम करणाऱ्या Tianyi Gao नावाच्या तरुणाने काही काळापूर्वी अॅमेझॉनमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याने परीक्षा आणि मुलाखतीच्या सर्व फेऱ्या पार करून नोकरी मिळवली. अॅमेझॉनने ऑफर लेटरही पाठवले. हे पत्र मिळाल्यानंतर तियानी गाओ याने गूगलचा राजीनामा दिला. गुगलने राजीनामा स्वीकारला आणि तियानीने नोटिस कालावधीची सेवा सुरू केली.

त्याच्याकडे अॅमेझॉन जॉईन करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी होते. अधिक पगार आणि नवीन जॉब प्रोफाइलबद्दल तो खूप आनंदी आणि उत्साहाने भरलेला होता. याताच त्याला एक ईमेल आला, ज्यात अॅमेझॉनने नोकरीची ऑफर मागे घेत असल्याचे सांगितले. हा ईमेल तियानीसाठी धक्कादायक होता.

तो म्हणाला की, 'मी आता गुगलला माझा राजीनामा मागे घेण्याची किंवा प्रक्रिया पुढे नेण्याची विनंती करू शकत नाही, कारण उशीर झाला आहे. आज माझा Google चा शेवटचा दिवस आहे. मी H1B व्हिसावर काम करतोय. दुसरी नोकरी शोधण्यासाठी माझ्याकडे फक्त 60 दिवस आहेत. नोकरी मिळाली तर ठीक, अन्यथा मला माझ्या देशात परत जावे लागेल.' त्याच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :googleगुगलamazonअ‍ॅमेझॉनInternationalआंतरराष्ट्रीय