शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उदयोन्मुख तंत्रज्ञान... भारतीय वापरकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:49 IST

लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानवशास्त्र, आभासी वास्तव, विद्युत वाहन या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आयुष्यात आमूलाग्र बदल होतील.

- निखिल वेलणकरल्या ५ हजार वर्षांत माणसांनी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली, त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षांत केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षांत केली, त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षांत केली. लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानवशास्त्र, आभासी वास्तव, विद्युत वाहन या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आयुष्यात आमूलाग्र बदल होतील. एकीकडे हे आधुनिक आणि अवाढव्य तंत्रज्ञान आणि दुसरीकडे कमी-जास्त शिकण्याची क्षमता असलेले सामान्य वापरकर्ते या दोन ध्रुवांना जोडण्याचं काम आमच्यासारखे युजर एक्सपीरिअन्स डिजाइनर करतात. त्यासाठी वापरकर्त्यांचा सखोल अभ्यास केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्राची उपशाखा आहे, असं म्हणता येईल. संगणक वा एखाद्या उपकरणाला माणसासारखी विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धी कृत्रिम पद्धतींनी प्रदान करण्याच्या शास्त्राला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात.‘मशिन्स विचार करू शकतात का?’ असा प्रश्न गणिततज्ज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांनी १९५० साली एका शोधनिबंधाद्वारे उपस्थित केला. इथेच कृत्रिम बुद्धिमत्ता शास्त्राची पायाभरणी झाली व अनेक प्रयोग सुरू झाले. आज आपण बँकेच्या किंवा ई-दुकानाच्या वेबसाइटवर जेव्हा मदतीसाठी चॅट करतो, तेव्हा आपण बरेचदा चॅट-बॉट या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान केलेल्या रोबॉटशी चॅट करत असतो. हल्ली ई-मेल आल्यानंतर तुम्हाला ती प्रणाली काही तयार उत्तरं सुचविते, हादेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचाच आविष्कार आहे. अ‍ॅमेझॉनने निर्माण केलेली अलेक्सआ, गुगल असिस्टंट, आयफोनमधली सिरी ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान केलेल्या हुशार सहकाऱ्यांची (रें१३ अ२२्र२३ंल्ल३) उदाहरणे आहेत. इतके की एक दिवस ही हुशार उपकरणं माणसावर राज्य तर नाही करणार ना? असा गंभीर प्रश्न अनेक परिषदांमध्ये उपस्थित करण्यात आलाय! दुबईमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयासाठी एका स्वतंत्र मंत्र्याची आणि खात्याची नेमणूक करण्यात आलीय!केमिकल उद्योग, फार्मास्युटिकल उद्योग, वाहन निर्मिती या क्षेत्रात बरंचसं यांत्रिकीकरण झालेलं आहे. तरीही भारतात याचा प्रवास आत्ता कुठे सुरू झालाय, असं म्हणता येईल. डिजिटायझेशनमुळे लोकांची जी प्रचंड माहिती (ऊं३ं) संगणकात साठविलेली आहे, तिचं विश्लेषण (ऊं३ं अल्लं’८३्रू२) कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करून कामाचा वेग वाढविता येईल का? असे प्रयोग सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अनेक स्टार्टअप कंपन्या भारतात सुरू झाल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, यासाठी विचार आणि प्रयोग सुरू झाले आहेत. एका अहवालाप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगामुळे २०३५ सालापर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये ९५७ अब्ज डॉलर्सची भर पडू शकते. त्या दृष्टीने धोरणे आणि आराखडा तयार करण्यात आला आहे.यंत्रमानवशास्त्र (फङ्मुङ्म३्रू२) हेदेखील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं एक पुढचं पाऊल आहे, असं म्हणावं लागेल. या क्षेत्रात नंतर अनेक प्रयोग करण्यात आले. आजचे यंत्रमानव हे इतके प्रगत अवस्थेत आहेत की एके दिवशी ते माणसावर राज्य करतील की काय, अशी चर्चा सुरू आहे. मध्यंतरी एका कंपनीने दोन हुशार यंत्रमानव तयार केले. त्यांनी स्वत:ची अशी स्वतंत्र, माणसाला न समजणारी भाषा तयार केली! हे कळताच त्या कंपनीनी तो प्रकल्प बंद केला! आज प्रातिनिधिक स्वरूपात का होईना, पण वकील, डॉक्टर, संगीतकार, वादक, चित्रकार यांची कामं करू शकणारे यंत्रमानव तयार झालेले आहेत! सोफिया या हुशार यंत्रमानवाला पहिल्यांदाच अधिकृत नागरिकत्व देण्यात आलं असून, ती सौदी अरेबियाची नागरिक आहे! आंतरराष्ट्रीय यंत्रमानव संस्थेच्या अहवालाप्रमाणे २०१८ साली जगभर एकूण २४,३९,५४३ यंत्रमानव कार्यरत होते! भारताही यंत्रमानवांचा वापर वाहननिर्मितीत सुरू झाला आहे.यंत्रमानवशास्त्राशी संबंधित अनेक स्टार्टअप कंपन्या आणि संशोधन संस्था भारतात कार्यरत आहेत. भारतामध्ये यंत्रमानवशास्त्र आणि यांत्रिकीकरण यांच्या प्रसारासाठी २०११ साली रोबोटिक्स सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘मानव’ नावाचा पहिला भारतीय यंत्रमानव २०१४ साली ए-सेट रोबोटिक्स नावाच्या संशोधन संस्थेने तयार केला. पुरेशी पायाभूत सुविधा नसल्यामुळे आणि यंत्रमानवशास्त्र शिकविणाºया पुरेशा संस्था नसल्यामुळे भारतातील यंत्रमानव उद्योग इतर देशांच्या तुलनेत प्राथमिक अवस्थेत जरी असला, तरी उद्योगांना कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने येत्या काळात खूप संधी निर्माण होणार आहेत. दिवसेंदिवस कमी होत जाणारा पेट्रोल/डिझेलचा साठा, त्यांच्या वाढणाºया किमती आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण पाहता, विद्युत वाहन हे एक पर्यावरण पोषक तंत्रज्ञान म्हणून मान्यता पावले आहे. १८ व १९व्या शतकात बॅटरीवर चालू शकेल, अशा वाहननिर्मितीविषयी अनेक प्रयोग विविध देशात चालू होते, पण कालांतराने पेट्रोल/डिझेलवर चालणाºया वाहनांच्या निर्मितीलासुद्धा वेग आला आणि विद्युत वाहनांची लोकप्रियता कमी झाली.अमेरिका विद्युत वाहन वापरणाऱ्यांना विशेष कर सवलत देते. युरोपातील देशांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विद्युत वाहन वापरण्यास सुरुवात केली. २०१७ साली जगभर साधारणत: ३० लाख विद्युत वाहने होती आणि हा आकडा २०३० सालापर्यंत १२ कोटी ५० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. भारतातही इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक बस अशा वाहनांचा वापर वाढला आहे. भारतातील विद्युत वाहन वापरातील काही प्रमुख अडचणी म्हणजे वाहनांच्या किमती, बॅटºयांची करावी लागणारी आयात आणि अपुरी चार्जिंग स्टेशन्स. सरकारी आणि खासगी पातळीवर या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातील दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी पाहता, विद्युत वाहन हा अतिशय पर्यावरण पोषक उपाय ठरणार आहे.(लेखक आंतरराष्ट्रीय युजर एक्स्पीरिअन्स स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स