शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:32 IST

ट्विटरचा मालकी हक्क प्राप्त केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या वर्क फ्रॉम एनेवेअर म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची योजना बंद करण्याचा विचार केला आहे.

नवी दिल्ली-

ट्विटरचा मालकी हक्क प्राप्त केल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या वर्क फ्रॉम एनेवेअर म्हणजेच कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची योजना बंद करण्याचा विचार केला आहे. जेणेकरुन सर्व कर्मचाऱ्यांना आता पुन्हा ऑफीसला बोलावता येईल. जर असं घडलं तर टेस्ला प्रमाणेच आता ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम ऑफीस करणं बंधनकारक असणार आहे. इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचेही मस्क हे मालक आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सोशल मीडिया कंपनीच्या काही निर्णयांमध्ये काही अपवाद देखील असू शकतात. निवडक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होन करण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकतो. ट्विटरचे नवे मालक सोशल मीडिया कंपनीच्या वर्कफोर्सला थेट अर्ध्यावर आणू इच्छितात. जेणेकरुन ऑपरेशन कॉस्ट कमी करता येईल. कंपनीत अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत हे याआधीच कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. ट्विटरमध्ये ७ हजाराहून अधिक लोक काम करतात. यात अर्ध्याहून अधिकांची नोकरी जाणार आहे. 

Work From Anywhere पॉलिसी लवकरच बंद होणार इलॉन मस्क आणि त्यांच्या टीममधील सल्लागारांनी कर्मचारी कपात तसेच इतर नियमांमध्ये बदल करण्याबाबत नुकतीच चर्चा केली आहे. अद्याप Work From Anywhere पॉलिसी नेमकी केव्हापासून बंद होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण येत्या काही आठवड्यात याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. कारण मस्क यांनी कंपनीतील सर्व टीम्ससाठी डेडलाइन निश्चित केली आहे.

जूनमध्ये टेस्लानं सर्व कर्मचाऱ्यांना Work From Office बंधनकारक केलं आहे. कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला एकूण मिळून ४० तास भरावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीची Work From Anywhere पॉलिसी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांनी सुरूच ठेवली होती. पण मस्क यांनी कंपनी टेकओव्हर केल्यानंतर पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

टॉप अधिकाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ताइलॉन मस्क यांनी ट्विटरचं अधिग्रहण केल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि पॉलिसी चीफ विजय गड्डे यांना नोकरीवरुन काढून टाकलं. ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार मस्क यांनी चीफ मार्केटिंग ऑफीसर लेस्ली बर्लेंड, चीफ कस्टमर ऑफिसर सराह परसोनेट आणि जीन फिलिप माहेयू यांनीही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.   

टॅग्स :Twitterट्विटर