शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 16:39 IST

तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे.

नवी दिल्ली, दि. 18 -  तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे. या अॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्वीकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच, हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला ते थेट बँक खात्याशी जोडता येईल. तेज अॅपद्वारे पैशांचे ट्रान्सफर सोपे आणि सुरक्षित असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या अॅपच्यामाध्यमातून आपल्याला जादा इन्कम मिळवता येणार आहे. यासाठी आपल्या मित्रांना ‘तेज’ अॅपचा वापर करायला सांगितले पाहिजे. जर एका महिन्यात तुम्ही आपल्या 20 मित्रांना ‘तेज’ अॅपचा वापर करण्यास सांगितले आणि ते यशस्वी झाले तर तुम्हाला यातून 1000 रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय या अॅपच्यामाध्यमातून इतर ऑफर्समधून सुद्धा आपल्याला इन्कम मिळवता येणार आहे. जसे की, तुम्ही भीम अॅप दुस-यांना वापरण्यास सांगितले की, 10 रुपयांचा फायदा होतो. त्याचप्रमाणे गुगलच्या ‘तेज’ अॅपमधून तुम्हाला फायदा करता येणार आहे. एका मित्राला तुम्ही जर ‘तेज’ अॅप वापरायला सांगितले की तुम्हाला 51 रुपये मिळणार आहेत. यासाठी गुगलने नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये जर तुमच्या सल्ल्यानुसार महिन्याला अधिकाअधिक 50 मित्रांनी तेज अॅपचा वापर केला, तर तुम्ही 2550 रुपये मिळवू शकता.  

काय आहे ‘तेज’ अॅप?- यूपीआयद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते तेज अॅपशी जोडल्यानंतर तुम्ही अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुस-या बँकेत रक्कम ट्रान्सफर करु शकता. - या अॅपमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गुगलच्या विविध स्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे हे अॅप वापरण्यास सुरक्षित असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे. - तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही तात्काळ एखाद्याला पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्विकारु शकता. त्यासाठी तुम्हाला फोन किंवा बँक अकाऊंटचा नंबर अशी खासगी माहिती शेअर करण्याची गरज नाही. - तेज अॅपवर इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, मराठी, तामिळ आणि तेलगु भाषा उपलब्ध असतील. - तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही जागीच चहावाल, दूधवाला, सलूनवाला यांना डिजिटल पेमेंट करु शकता. - या अॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे. 

बक्षीस जिंकण्याची संधी... -अॅपमध्ये तेज स्क्रॅच कार्ड असेल. योग्य व्यवहारासाठी ग्राहकाला 1 हजार रुपयापर्यंत रक्कम जिंकता येईल. - तेज लकी रविवारी स्पर्धेत ग्राहकाला दर आठवडयाला 1 लाखापर्यंत रक्कम जिंकता येईल.- 50 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार करणारेच तेज अॅप स्पर्धेसाठी पात्र असतील. 

टॅग्स :Mobileमोबाइल