शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

ड्युअल फ्रंट कॅमे-यांनी सज्ज झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ 

By शेखर पाटील | Published: February 19, 2018 6:43 PM

झिऑक्स कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

झिऑक्स कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

अलीकडच्या कालखंडात बहुतांश उच्च व मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येत आहेत. यात काही कंपन्या अत्यंत किफायतशीर मूल्यात ड्युअल कॅमेर्‍याची सुविधा देत नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. यात झिऑक्स या कंपनीचा समावेश आहे. झिऑक्सने गत काही महिन्यांमध्ये ड्युओपिक्स आर१ आणि ड्युओपिक्स एफ१ हे याच प्रकारातील मॉडेल्स लाँच केले आहेत. यात अनुक्रमे ड्युअल फ्रंट आणि ड्युअल रिअर कॅमेर्‍यांची सुविधा देण्यात आली आहे. या अनुषंगाने आता बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ या मॉडेलमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरे दिलेले आहेत. यांचे क्षमता अनुक्रमे ८ व २ मेगापिक्सल्स इतकी असेल. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात सेल्फी फ्लॅशसुध्दा देण्यात आलेला आहे. तर ऑटो-फोकस आणि क्वॉड एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. विशेष बाब म्हणजे याच्या फ्रंट व रिअर कॅमेर्‍यांमध्ये बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, झिऑक्स ड्युओपिक्स एफ ९ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर २.५ डी ग्लासे आवरण दिले आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. हे मॉडेल ग्राहकांना ६,४९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.