शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ड्युअल कॅमेरा असलेला Vivo X20 आणि Vivo X20 Plus स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:05 IST

चीनची स्मार्टफोन मोबाइल कंपनी असलेल्या विवोने दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने आज विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंच केले. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपये अशी आहे.

ठळक मुद्देविवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंचकिंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपयेप्री-ऑर्डर 25 सप्टेंबरपासून सुरु होणार

नवी दिल्ली, दि. 22 - चीनची स्मार्टफोन मोबाइल कंपनी असलेल्या विवोने दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने आज विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंच केले. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपये अशी आहे. या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या या दोन्ही स्मार्टफोनची विक्री चीनच्या बाजारात सुरु आहे.    अलीकडे काही कंपन्या सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत असून यामध्ये विवो कंपनी आघाडीवर आहे. या अनुषंगाने विवो कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 24 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही 7 प्लस हा स्मार्टफोन आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत लॉचिंगच्यावेळी 21, 990 रुपये इतकी होती. सध्या  विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन चीनमध्ये आणण्यात आले आहेत. मात्र, काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत सुद्धा  दाखल होणार आहेत. विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोनमध्ये अधिक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून हायलाईट आहे. तसेच,  f/1.8 अपार्चरयुक्त 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनला फुल व्यू स्क्रीन आहे. विवो X20 स्मार्टफोन 6.1 इंचाचा आणि विवो X20 प्लस स्मार्टफोनला 6.43 इंचाची स्क्रीन आहे. त्याची रिझॉल्यूशन 1080×2160 पिक्सल आहे. याचबरोबर, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमसह अॅन्ड्राईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच, प्रोसेसर ऑक्टाकोर (2.2GHz+1.8GHz) दिला आहे. तर, Snapdragon 660 चिपसेटसह 4 जीबी रॅम दिली आहे. इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. मात्र दोन्ही या स्मार्टफोन बॅटरीची क्षमता वेगवेगळी देण्यात आली आहे. विवो X20 स्मार्टफोनमध्ये 3245mAh आणि विवो X20 प्लसमध्ये 3905mAh इतक्या क्षमतेची आहे. याशिवाय दोन्ही स्मार्टफोनमध्ये फोर-जी नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टयुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइल