शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोन उद्योग घेणार कोट्यवधींची उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:57 IST

ड्रोनचा वापर गेल्या पाच वर्षांत अनेक पटींनी वाढला

‘ड्रोन’ला कधी काळी खेळणे म्हटले जात होते, पण आता या तंत्रज्ञानाची झेप कोट्यवधी रुपयांच्या इंडस्ट्रीत झाली आहे. विशेषत: सरकारी उपयोग सुरू झाल्यापासून ड्रोनचा वापर गेल्या पाच वर्षांत अनेक पटींनी वाढला आहे. फिकीच्या अहवालानुसार पुढच्या दोन वर्षांत भारतातली ड्रोनची बाजारपेठ ८८.५७ कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.फ्लाइंग मिनी रोबोट्स किंवा ‘अनमॅन्ड एरियल व्हेइकल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रोन्सची लोकप्रियता गेल्या पाच वर्षांत वाढलेली दिसते. मनुष्य जिथे पोहोचू शकत नाहीत, तिथे ड्रोन पोहोचत असल्याने खास करून मिलिटरी, संरक्षण, तसेच व्यावसायिक कारणांसाठी ड्रोन्सचा वापर वाढला आहे. हवाई छायाचित्रण एवढ्यापुरताच ड्रोन्सचा वापर आता मर्यादित राहिलेला नाही, तर औषधे-भोजनाचे वितरण, शेती, जिओग्राफिक मॅपिंग, सर्च अँड रेस्क्यू आॅपरेशन यांसारख्या शंभरपेक्षा जास्त कारणांसाठी ड्रोन आताच वापरले जात आहे. शेतांमध्ये खते देण्यासाठी आॅटोमेटिक पद्धतीचे ड्रोन कसे परिणामकारक वापरता येतील, याच्या चाचण्या सुरू आहेत. वाहतूक नियंत्रण, अपघात-नैसर्गिक आपत्ती आदींमध्ये ड्रोन कसे वापरता येतील, याची चाचपणी सुरू आहे. एकूणच माणसाचा जीव धोक्यात न घालता जोखमीची कामे करण्यासाठी भविष्यात ड्रोनचा वापर वाढणार आहे. एकट्या अमेरिकेत येत्या पाच वर्षांत केवळ ड्रोनमुळे दहा लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेला ड्रोनमुळे चालना मिळणार असून, अमेरिकेतील ड्रोन इंडस्ट्री तब्बल ८२ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा अंदाज असोसिएशन फॉर अनमॅन्ड व्हेइकल सिस्टम्स इंटरनॅशनल संस्थेने व्यक्त केला आहे.अर्थात, इतर अनेक तंत्रज्ञानाप्रमाणे ड्रोनच्या बाबतीतही भारत पश्चिमी देशांकडे डोळे लावून बसला आहे. सध्याचे ड्रोन तंत्रज्ञान सहाव्या जनरेशनचे आहे. ‘जनरेशन-७’ प्रगतिपथावर आहे. ३-डीरोबोटिक्सने ‘सोलो’ या जगातील पहिल्या स्मार्ट ड्रोनची घोषणा केलेली आहे. या ड्रोन्समध्ये सेफगार्ड, स्मार्ट अ‍ॅक्युरेट सेन्सर्स, सेल्फ मॉनिटरिंग यांसारख्या अनेक बाबींचा समावेश असणार आहे.ड्रोन व्यवहारांवर भारतात डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन नजर ठेवून आहे. आॅनलाइन अन्नपुरवठा करणाºया कंपन्यांना शहरांमध्ये ‘फूड डिलिव्हरी’साठी ड्रोनचा वापर करायचा आहे. त्यासाठीच्या चाचण्या चालू आहेत. मात्र, प्रत्यक्षात हा वापर सुरू होण्यासााठी येणाºया वर्षातला उत्तरार्ध उजाडेल, असे दिसते. सध्या ड्रोनचा ४२.९ टक्के उपयोग फोटो काढण्यासाठी, २०.७ टक्के वापर बांधकाम क्षेत्रात, १०.९ टक्के वापर युटिलिटी साठी होतो. कमर्शियल आणि सिव्हिलियन ड्रोनचा वापर येत्या वर्षभरात १९ टक्क्यांनी वाढणार आहे. ड्रोनचे विविध वापर लक्षात घेता मोबाइलप्रमाणेच ड्रोन उद्योग येत्या काळात बहरल्यास आश्चर्य वाटायला नको.