शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरची दुप्पट वेगवान सुपरफास्ट आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: September 27, 2017 15:15 IST

मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे

ठळक मुद्देफायरफॉक्स ब्राऊजरच्या या आवृत्तीला मोझिलाने फायरफॉक्स क्वाँटम हे नाव दिले आहेमोझिलाने गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रोजेक्ट क्वाँटमची घोषणा केली होती, यानुसार हे ब्राऊजर सादर करण्यात आलेफायरफॉक्स ब्राऊजरची ही नवीन आवृत्ती आधीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी गतीमान असल्याचा मोझिलाचा दावा

मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टद्वारे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे फॉयरफॉक्स ब्राऊजरच्या ५६व्या आवृत्तीपासूनच फ्लॅश या अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअरचा सपोर्ट काढण्यात आला असल्याने या आवृत्तीतही फ्लॅश ब्लॉक करण्यात आले आहे. मोझिलाने याबाबत आधीच घोषणा केली होती. फ्लॅशमध्ये सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्यामुळे याचा सपोर्ट काढण्यात आला आहे. यामुळे फायरफॉक्स ब्राऊजरच्या या आवृत्तीत फ्लॅशवर आधारित अ‍ॅनिमेशन वा अन्य फाईल्स दिसणार नाहीत.

फायरफॉक्स ब्राऊजरच्या या आवृत्तीला मोझिलाने फायरफॉक्स क्वाँटम हे नाव दिले आहे. मोझिलाने गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रोजेक्ट क्वाँटमची घोषणा केली होती. यानुसार हे ब्राऊजर सादर करण्यात आले आहे. फायरफॉक्स ब्राऊजरची ही नवीन आवृत्ती आधीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी गतीमान असल्याचा मोझिलाचा दावा आहे. याशिवाय क्रोमए मायक्रोसॉफ्ट एज, सफारी आणि अन्य ब्राऊजरपेक्षाही हे अधिक गतीमान आणि कार्यक्षम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे ब्राऊजर मोझिलाच्या प्रोजेक्ट फोटॉनवर आधारित आहे. अर्थात याचे डिझाईन यानुसार करण्यात आले आहे. यात सुटसुटीत चौरसाकृती टॅब देण्यात आल्या आहेत. तर बुकमार्क, हिस्टरी, स्क्रीनशॉट, डाऊनलोड आदींसाठी यात क्विक अ‍ॅक्सेस प्रदान करण्यात आला आहे. याचा इंटरफेस अतिशय सुलभ असून तो विंडोज १०, अँड्रॉइड ओरिओ, आयओएस ११ आणि मॅकओएस हाय सिएरा या सर्व प्रणालींवर समान पध्दतीने वापरता येतो. अर्थात संगणक, लॅपटॉप, टॅबलेटसह स्मार्टफोनवर फायरफॉक्स ब्राऊजर आता सुपरफास्ट गतीने वापरता येणार आहे.

फायरफॉक्स ब्राऊजरच्या या नवीन आवृत्तीमध्ये मोझिलाने गेल्या वर्षी अधिग्रहीत केलेले पॉकेट हे अ‍ॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही एका स्वतंत्र विभागात बुकमार्क केलेले वेब पेजेस ऑफलाईन पध्दतीत वाचू शकतो. याशिवाय यात अन्य युजर्सच्या रेकमेंडेशननुसार प्रत्येक युजरला कंटेंट सजेस्ट केले जाणार आहे. ही नवीन आवृत्ती सर्व युजर्सला १४ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. तथापि, जगभरातील युजर्ससाठी याची प्रयोगात्मक (बीटा) आवृत्ती आता सादर करण्यात आली आहे. याचा कुणीही वापर करू शकतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान