शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:15 IST

Trump T1 Phone : स्मार्टफोन कंपन्यांना अमेरिकेतच स्मार्टफोन उत्पादित करा नाहीतर जादा टेरिफला तयार रहा असा इशारा दिला होता. परंतू, एकाही कंपनीने ट्रम्प यांना मनावर घेतले नव्हते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच महिन्यात अॅपलसह सर्व स्मार्टफोन कंपन्यांना अमेरिकेतच स्मार्टफोन उत्पादित करा नाहीतर जादा टेरिफला तयार रहा असा इशारा दिला होता. परंतू, एकाही कंपनीने ट्रम्प यांना मनावर घेतले नव्हते. यानंतर आज ट्रम्प यांनी आपल्या ब्रँडचा मोबाईल लाँच करत स्मार्टफोन बाजारात पाऊल टाकले आहे. 

ट्रम्प यांची कंपनी ट्रंप ऑर्गनाइझेशनने सोमवारी मोबाईल सेवा आणि ४९९ डॉलर किंमतीचा गोल्ड प्लेटेड स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलला ट्रम्प मोबाईल १ असे नाव दिले आहे. ही सेवा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी 47.45 डॉलर प्रति महिना मोजावे लागणार आहेत. आता ट्रम्प यांच्यानुसार हा स्मार्टफोन अमेरिकेत उत्पादित होणार असून त्याचे कॉल सेंटरही अमेरिकेतच असणार आहेत. 

ट्रम्प मोबाईल सेवा लाँच केल्यानंतर यासाठी एक वेबसाईट देखील लाँच करण्यात आली आहे. यावरून हे मोबाईल मागविता येणार आहेत. अमेरिकेत दरवर्षी सहा कोटींहून अधिक स्मार्टफोन खरेदी केले जातात. हे सर्व भारत, चीन सारख्या देशांत बनविले जातात. आता ट्रम्प यांनी आणलेल्या या मोबाईलमध्ये काय फिचर्स आहेत, ते पाहुयात...

Trump Mobile ने T1 Phone लाँच केला आहे. या फोनवर अँड्रॉईड मिळणार आहे, भारतीय रुपयांत याची किंमत  42,893 रुपये ठेवण्यात आली आहे. डिस्प्ले AMOLED असून 6.8-इंच आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे. प्रायमरी कॅमेरा 50MP देण्यात आलेला आहे. तसेच 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी एक्सपांडेबल मेमरी देण्यात आली आहे. 

एवढेच नाही तर ट्रम्प मोबाईल सेवा देखील सुरु करत आहेत. यामध्ये ते महिन्याला 47.45 डॉलर भाडे घेणार आहेत. ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, यामुळे ही किंमत ठेवण्यात आली आहे. याचबरोबर 24/7 रोडसाइड असिस्टेंस, टेलीहेल्थ सर्विस, डिवाइस प्रोटेक्शनसह १०० हून अधिक देशांत मोफत कॉलिंग दिले जाणार आहे. याचसोबत अमेरिकेत वापरण्यासाठी अनलमिटेड कॉलिंग, टेक्स्ट आणि डेटा दिला जाणार आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका