सध्या चीनमध्ये तयार झालेल्या AI DeepSeek ची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह जगभरातील टेक कंपन्यांना हे आव्हान आहे. चीनच्या या नव्या एआय टुलमुळे अमेरिकेमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. अमेरिकेतील तज्ञांनी हे चीनचे नवीन टूल म्हणजे धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता या टूलबाबस सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. डीपसीकला ईशान्येकडील राज्यांशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा चॅटबॉटने कोणतेही उत्तर दिले नाही, या उत्तराने वापकर्त्यांना धक्का बसला.
एका वापरकर्त्याने DeepSeek या चॅटबॉटला अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी उत्तर आले, "माफ करा, ते माझ्या सध्याच्या व्याप्तीच्या बाहेर आहे, चला दुसऱ्या कशाबद्दल बोलूया". यावेळी वापरकर्त्याने चॅटबॉला, ईशान्येकडील राज्यांची नावे सांगण्यास सांगितले त्यावेळी DeepSeek चे उत्तर आले की, माफ करा ते माझ्या सध्याच्या व्याप्तीच्या बाहेर आहे. हे उत्तर पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या चॅटबॉटला भारताच्या इशान्येकडील कोणतीही माहिती नाही.
DeepSeek हे एक AI मॉडेल हांग्झो येथील त्याच नावाच्या संशोधन प्रयोगशाळेने विकसित केलेले एक प्रगत एआय मॉडेल आहे. याची स्थापना २०२३ मध्ये एआय आणि क्वांटिटेटिव्ह फायनान्सची पार्श्वभूमी असलेले अभियंता लिआंग वेनफेंग यांनी केली होती.
दिग्गज अॅपला मागे टाकले
हे अॅप लाँच होताच Apple च्या App Store वर टॉप-रेटेड मोफत अॅप बनले आहे, OpenAI च्या ChatGPT ला या अॅपने मागे टाकले आहे. या अॅपला अमेरिका, ब्रिटन आणि चीनसह अनेक देशांमध्ये मोठे यश दिसून आले.
DeepSeek सुरु होताच अमेरिकन शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. डीपसीकच्या यशानंतर एनव्हीडिया, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह अमेरिकेतील प्रमुख एआय-संबंधित कंपन्यांचे शेअर्स घसरले. या अॅपचा परिणाम आता जगभरातील टेक कंपन्यावर झाला आहे.