शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न सांगून अडकवलं जातंय जाळ्यात; 'या' बँकांच्या नावाने हॅकर्स करताहेत फ्रॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 16:15 IST

Cyber Criminals : हॅकर्स युजर्सचा डेटा मिळवण्यासाठी त्यांना विविध पद्धतीने आकर्षित करत आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न सांगून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. 

नवी दिल्ली - सर्व टॅक्स पेयर्स ज्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करतात. तेव्हा आपला रिफंड परत मिळवण्यात काही दिवस लागतात. काही वेळा एक महिन्यापासून ते तीन, चार महिन्यांचा वेळ देखील लागू शकते. याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत आहेत. ते चुकीची माहिती सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करत असव्याची माहिती आता समोर आली आहे. सोमवारी आलेल्या एका नवीन रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. हॅकर्स युजर्सचा डेटा मिळवण्यासाठी त्यांना विविध पद्धतीने आकर्षित करत आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न सांगून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. 

काही लोकांनी संशयास्पद मेसेज येत आहेत. ज्यामध्ये लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसाठी अर्ज सबमिट करण्यास सांगितले जात आहे. यानंतर लोकांना एक लिंक पाठवून त्याद्वारे वेबपेजवर रि-डायरेक्ट केले जाते. हे दिसायला आयकर ई-फायलिंग वेब पेज सारखे दिसते. यादरम्यान फ्रॉड करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय (ICICI), एचडीएफसी (HDFC), एक्सिस बँक (Axis Bank) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या नावाचा वापर केला जात आहे. 

दिल्ली बेस्ड थिंक टँक सायबरपीस फाऊंडेशनसोबत सायबर सिक्योरिटी फर्म ऑटोबोट इन्फोसिकने याची माहिती उघड केली आहे. या फ्रॉडमध्ये सेफ https च्या जागी सामान्य http प्रोटोकॉलचा वापर केला जात आहे. यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेट ट्रॅफिकला रोखता येऊ शकते. युजर्संचा चुकीचा वापर करून त्याची माहिती सहज प्राप्त करू शकता येते. याशिवाय यात युजर्संना गुगल प्ले स्टोरच्या जागी थर्ड पार्टी सोर्सवरून App डाउनलोड करण्यास सांगितले जाते. 

ज्यावेळी ग्रीन रंगाच्या प्रोसीड टू द व्हेरिफिकेशन स्टेप्स बटनवर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांचे पूर्ण नाव, पॅन, आधार नंबर, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल एड्रेस, जेंडर, वैवाहिक स्थिती, आणि बँकींग माहिती जसे अकाउंट नंबर, आयएफसी कोड , कार्ड नंबर एक्सपायरी डेट, सिव्हीव्ही, कार्ड पिन सारखी माहिती भरा, असे सांगितले जाते. तसेच ऑनलाईन बँकिंगसाठी युजरनेम आणि पासवर्ड देखील मागितला जातो. मात्र युजर्सनी अशा फ्रॉडपासून सतर्क राहणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम