ऑनलाईन फ्रॉड झाल्यावर पैसे मिळतील परत; ‘हा’ 4 अंकी नंबर आत्ताच करा मोबाईलमध्ये सेव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:01 PM2022-05-12T13:01:28+5:302022-05-12T13:01:39+5:30

Cyber Crime च्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱ्याचदा यांची तक्रार कुठे करायची हा प्रश्न पडतो. यासाठी आता गृह मंत्रालय आणि DoT नं मिळून एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.  

Cyber Crime Helpline By MHA Dial 1930 To Report And Prevent Cyber Fraud  | ऑनलाईन फ्रॉड झाल्यावर पैसे मिळतील परत; ‘हा’ 4 अंकी नंबर आत्ताच करा मोबाईलमध्ये सेव्ह 

ऑनलाईन फ्रॉड झाल्यावर पैसे मिळतील परत; ‘हा’ 4 अंकी नंबर आत्ताच करा मोबाईलमध्ये सेव्ह 

googlenewsNext

भारतात डिजिटल पेमेंट सिस्टम युपीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे Cyber Crime च्या घटना देखील वाढत आहेत. जेवढं आयुष्य सुखकर होतं आहे तेवढीच आर्थिक हानी अनेक लोकांना होत आहे. यावर तोडगा म्हणून गृह मंत्रालयाने एक हेल्पलाइन नंबर जारी केला होता. या नंबरवर तुम्ही सायबर क्राईम संबंधित घटनांची तक्रार करू शकता. याआधी जारी करण्यात आलेला 155360 हा नंबर आता बदलण्यात आला आहे.  

सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून तुम्ही सायबर फ्रॉडची तक्रार करू शकता. यामुळे तुम्हाला सायबर क्राईममुळे चोरीला गेलेले पैसे परत मिळवण्यास मदत केली जाईल. त्यामुळे जर एखाद्या हॅकर किंवा स्कॅमरनं तुम्हाला लक्ष केल्यास तुम्हाला फक्त 1930 वर कॉल करावा लागेल. हा एक आपत्कालीन नंबरप्रमाणे काम करेल. तुम्ही सायबर गुन्ह्यात अडकल्यास त्वरित ही सर्व माहिती सायबर हेल्पलाइन नंबरवर द्या.   

अशाप्रकारे काम करेल हेल्पलाइन नंबर 

कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीनं हेल्पलाइन नंबर डायल करावा. त्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर औपचारिक तक्रार करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर एक तिकीट जेनरेट होईल, ज्यात फायनेंशियल इंटरमिडियरीज (FI) कंसर्नची माहिती असेल.  

बळी पडलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटची माहिती फ्रॉड ट्रांजॅक्शन तिकीट डेबिटेड एफआय म्हणून दाखवण्यात येईल. तर सायबर गुन्हेगाराच्या बँक अकाऊंटची माहिती क्रेडिटेड Fl मध्ये डॅशबोर्डवर दिसेल. तुमची बँक किंवा वॉलेट जिथे तिकीट गेली असेल, ते फ्रॉड ट्रांजॅक्शनची माहिती बघतील. जर पैसे गेले नसतील तर ते होल्ड केले जातील नसेल तर समोरील Fl ला याची माहिती दिली जाते. 

Web Title: Cyber Crime Helpline By MHA Dial 1930 To Report And Prevent Cyber Fraud 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.