शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांविरोधात केंद्र सरकारची ‘डिजिटल स्ट्राइक’; I4C कडून होणार कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 20:55 IST

Cyber Crime: देशभरात सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने फास आवळायला सुरुवात केली आहे.

Cyber Crime: देशभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना आर्थिक आणि मानसिक फटका बसत असल्याने सायबर फसवणूक रोखण्यासाठी व्यापक स्तरावर ‘डिजिटल स्ट्राइक’ची तयारी करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सायबर फसवणूक ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करत डेटा चोरी आणि ऑनलाइन फसवणूक देशासाठी धोका ठरत असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर Indian Cyber Crime Coordination Centre(I4C) ही संस्था सक्रियपणे काम करत आहे.

I4Cची स्थापना २०१८ मध्ये करण्यात आली असून, देशातील विविध तपास यंत्रणा, पोलीस आणि वित्तीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे काम ही संस्था करते. नागरिकांनी हेल्पलाइन किंवा सरकारी पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित प्रकरण ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’कडे पाठवले जाते. या प्रणालीद्वारे पोलिसांना बँका आणि इतर वित्तीय संस्थांशी जोडून फसवणुकीतील पैसे त्वरित गोठवण्यास मदत होते. या वर्षाच्या जानेवारीपर्यंत या यंत्रणेमुळे ८,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांवरही सरकारने कारवाई सुरू ठेवली आहे. आतापर्यंत सुमारे १२ लाख सिम कार्ड रद्द करण्यात आले असून जवळपास ३ लाख मोबाईल फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. मेसेंजर अॅप्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सिम बायंडिंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. WhatsAppसह सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, याची अंमलबजावणी करण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cybercrime Crackdown: India Launches 'Digital Strike' Against Online Fraud

Web Summary : The government intensifies efforts against cyber fraud with a 'digital strike' led by I4C. Measures include blocking SIM cards and mobile phones, and mandating SIM binding for messaging apps to curb financial fraud and protect national security. Over 8,000 crore rupees saved.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार